AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या आईवडिलांना टोमणे मारायचे, तिच्याशी कोणी लग्न करणार नाही’; स्मृती मंधाना व्यक्त

भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला ‘नॅशनल क्रश’ म्हटलं जातं. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच तिने कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी लग्न आणि करिअर याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.

'माझ्या आईवडिलांना टोमणे मारायचे, तिच्याशी कोणी लग्न करणार नाही'; स्मृती मंधाना व्यक्त
Smriti Mandhana Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2023 | 10:20 AM
Share

मुंबई : 27 डिसेंबर 2023 | भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने नुकतीच ‘कौन बनेगा करोडपती 15’च्या सेटवर हजेरी लावली. या खास एपिसोडमध्ये तिच्यासोबत क्रिकेटर इशान किशनसुद्धा सहभागी झाला होता. हॉटसीवर बसल्यानंतर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी तिला तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारले. त्यात स्मृतीच्या लग्नाचाही विषय होता. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तिने अत्यंत मोकळेपणे दिली. या शोमध्ये स्मृतीने तिचा आतापर्यंतचा प्रवाससुद्धा सांगितला. स्मृतीचे वडील आणि भाऊ हे क्रिकेटमध्येच होते. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनी क्रिकेट खेळावं आणि त्यापैकी किमान एकाने तरी भारताचं प्रतिनिधित्व करावं, असं वडिलांचं स्वप्न असल्याचं ती म्हणाली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधान आणि भाऊ श्रवण यांनी सांगलीसाठी जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळलं होतं.

क्रिकेटच्या प्रवासाबद्दल बोलताना स्मृती पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की मी आईच्या गर्भात असल्यापासूनच क्रिकेटविषयी समजू लागले होते. नेटच्या मागे उभं राहून माझ्या भावाला खेळताना पाहून मी बॅटिंग शिकले. मी खरंतर उजव्या हाताने बॅटिंग करते. पण माझा भाऊ डाव्या हाताने खेळायचा, म्हणून त्याला पाहून पाहून मी डाव्या हाताने बॅटिंग करायला शिकले. अशाच प्रकारे मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.” यानंतर बिग बी तिला तिच्या आव्हानांविषयी प्रश्न विचारतात. “खेळाच्या बाबतीत तू कोणत्या आव्हानांचा सामना केलास? त्या आव्हानांवर तू कशी मात केलीस”, असा सवाल त्यांनी केला.

बिग बींच्या प्रश्नाचं उत्तर देताना स्मृतीने सांगितलं, “जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा बहुतांश वेळा मुलांसोबत प्रॅक्टिस करावं लागायचं. कारण तेव्हा फारशा मुली क्रिकेट खेळत नव्हत्या. त्यामुळे मला क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य दिल्याबद्दल मी माझ्या आईवडिलांची ऋणी आहे. त्यांनी मला कधीच कमीपणा वाटू दिला नाही.” स्मृतीकडून हे ऐकल्यानंतर बिग बी तिच्या आईवडिलांची स्तुती करतात. “वाह, हे खूपच चांगलं आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. तुमचे विचार आधुनिक आहेत. महिलांनासुद्धा पुरुषांसमान संधी मिळाल्या पाहिजेत”, असं ते म्हणतात.

बिग बींनी आईवडिलांची स्तुती केल्यानंतर स्मृती पुढे म्हणते, “माझ्या आईवडिलांना आधी लोक टोमणे मारायचे. जर ती काळी झाली तर तिच्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं ते म्हणायचे. पण सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कधीच त्या टोमण्यांमुळे माझं खेळणं थांबवलं नाही. त्यांनी मला नेहमीच खेळण्याची परवानगी दिली होती.”

स्मृती मंधानाचा जन्म मुंबई 18 जुलै 1996 रोजी झाला. तिने आतापर्यंत 6 टेस्ट, 80 वनडे आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने अनुक्रमे 480, 3179 आणि 2998 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिची सरासरी 27.25 आणि स्ट्राइक रेट 122.46 इतकी आहे.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प