S P Balasubrahmanyam | गायक बालासुब्रमण्यम यांना कोरोना, प्रकृती चिंताजनक

प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली आहे (Playback singer S P Balasubrahmanyam tested corona positive).

S P Balasubrahmanyam | गायक बालासुब्रमण्यम यांना कोरोना, प्रकृती चिंताजनक

चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली आहे (Playback singer S P Balasubrahmanyam tested corona positive). बालासुब्रमण्यम यांच्यावर चेन्नईती एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर येत आहे. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एसपी बालासुब्रमण्यम 5 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होती. मात्र, 13 ऑगस्ट रात्री उशिरा अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूत दाखल करण्यात आलं.

एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या मित्रांना फोन न करण्याची विनंती केली होती. याशिवाय दोन-चार दिवसात डिस्चार्ज मिळेल, असंदेखील ते म्हणाले होते.

“गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होतं. याशिवाय थोडा खोकलाही येत होता. त्यानंतर थोडा तापही आला. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. तिथे गेल्यावर मला माहिती पडलं की, माझ्यात कोरोनाती सुक्ष्म लक्षणं आहेत. डॉक्टरांनी मला होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. पण मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबातील सदस्य खूप चिंता करत आहेत”, असं बालासुब्रमण्यम म्हणाले होते.

हेही वाचा : माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, परमेश्वर आणि पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभारी : अमित शाह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *