मुंबईत चोरी, बिहारमध्ये ऐश.., Bigg Boss फेम अभिनेत्रीच्या घरातून कोट्यवधी लंपास करणारा पोलिसांच्या ताब्यात
Bigg Boss फेम अभिनेत्रीच्या घरातून कोट्यवधींची चोरी, चोरट्याचा बहिणीच्या नावावर जमीन घेण्याचा डाव फसला..., पोलिसांच्या मोठ्या कारवाईनंतर बिहार येथून चोरट्याला अटक... जाणू घ्या नेमकं काय घडलं आहे...

Bigg Boss : मुंबई येथील सांताक्रूझ मध्ये राहणारी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोपामुद्रा राऊत हिच्या घरात चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अखेर पोलिसांच्या मोठ्या कारवाईनंतर चोरट्या अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आणि कसून चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, पोलिसांनी तब्बल 76 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. बिहार येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
26 वर्षीय आरोपी बिहार येथून अटक
पोलिसांनी आरोपील बिहार येथून अटक केली आहे. तर आरोपीची ओळख चंदन कमलेश मुखिया अशी असून त्याचं वय फक्त 26 वर्ष आहे. चंदन याने अभिनेत्रीच्या घरी तेव्हा चोरी केली, जेव्हा ती 20 ते 27 जुलै रोजी शहराबाहेर होती. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातून सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्किट आणि रोकड देखील जप्त केली. अशात सांताक्रूझ पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन करत प्रकरण मार्गी लावलं. तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि आरोपी बिहार येथे असल्याचं कळलं…
मुंबई पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनचे रेकॉर्ड्स आणि लोकेशन डेटाचीही तपासणी केली, ज्यातून तपासकर्त्यांना बिहारमधील दरभंगाकडे असलेले पुरावे आढळले. तपासादरम्यान पोलिसांना असंही आढळून आलं की, आरोपीने चोरीच्या पैशांचा वापर करून आपल्या बहिणीच्या नावे जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता.
76 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरातून तब्बल 76 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी जप्त केली आहे. आरोपी अद्यापही पोलीस कोठडीत असून, त्याची अद्यापही चौकशी सुरुच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन कमलेश मुखिया याने जुलैमध्ये अभिनेत्री राऊत हिच्या घराची रेकी केलेल आणि जेव्हा त्याला कळलं की, अभिनेत्री घरी नाहीये तेव्हा त्याने चोरी केली. त्यानंतर ट्रेनने बिहार येथे परतला.