AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची एण्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. ही अभिनेत्री या मालिकेत राजकारणी बाळजाबाईची भूमिका साकारणार आहे.

'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची एण्ट्री
मालिकेत साकारणार राजकारणी बाळजाबाईची भूमिका Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2025 | 1:58 PM
Share

‘सर्जा’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंखे लवकरच ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा आहे. ती गावाची जणू आईच आहे. वरकरणी अत्यंत प्रेमळ भासत असली तरी कमालीची सत्तालोलुप आणि पाताळयंत्री आहे. तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती काहीही करु शकते. घर आणि गावाची सगळी सूत्रं तिच्या हातात आहेत. गावची सरपंच पदाची निवडणूक जिंकण्याचं तिचं ध्येय आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ती आपला मुलगा दुष्यंत आणि गावातली सर्वसामान्य शेतकरी मुलगी कृष्णाचं लग्न करुन देण्यासही तयार होते.

बाळजाबाईची ही भूमिका साकारत असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकेतून भेटीला येणार आहेत. बाळजाबाई या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “या मालिकेत मी खलनायिका साकारते आहे. एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारताना कस लागतो. बाळजाबाई हे अत्यंत प्रभावशाली असं पात्र आहे. दोन मुखवटे घेऊन वावरणारी. म्हणजे समाजात वावरताना ती जितकी नम्रपणे वागते तितकीच ती धूर्त आहे. बाळजाबाईचं वागणं, बोलणं, तिचं रहाणीमान या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करतेय. बाळजाबाई हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा आणि खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असलेला दुष्यंत अशी अत्यंत विजोड असलेली जोडी अपघाताने एकत्र येते. हा अपघात नव्या नात्याची सुरुवात असेल की अखेरची भेट याची अतिशय उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर आणि लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. ही नवी मालिका येत्या 7 जुलैपासून दुपारी 1 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.