AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poonam Dhillon : ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यू; चाहत्यांची चिंता वाढली, हेल्थ अपडेट समोर

ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती मैत्रीण पद्मिनी कोल्हापुरी यांनी दिली आहे. चाहत्यांमध्ये चिंता असली तरी पूनम वेगाने बऱ्या होत आहेत. दरम्यान, CINTAA मधील वादामुळेही त्या चर्चेत होत्या.

Poonam Dhillon : ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यू; चाहत्यांची चिंता वाढली,  हेल्थ अपडेट समोर
Actress Poonam Dhillon Hospitalized
| Updated on: Aug 22, 2026 | 6:33 PM
Share

Poonam Dhillon Hospitalised : नितळ हसू, बोलके डोळे आणि सौंदर्याने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो (Poonam Dhillon) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूनम या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली . मात्र त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत.  दरम्यान, पूनम यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. ‘ पूनम यांची प्रकृती आता स्थिर असून त्या वेगाने रिकव्हर होत आहेत. प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत’ अस पद्मिनी कोल्हापुरे यांनी नमूद केलं.

CINTAAमधील वादामुळेही चर्चेत

खरंतर गेल्या काही काळापासून सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात CINTAAमधील नेतृत्वाच्या वादामुळेही पूनम धिल्लो या चर्चेत होत्या. CINTAAची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र CINTAA च्या जनरल सेक्रेटरी आणि अभिनेत्री उपासना सिंह यांनी पूनम धिल्लो आणि उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरी यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप केला होता.  या वादानंतर समितीतील 11 सदस्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं होतं. त्यामध्ये विंदू दारा सिंह, पुनीत इस्सर, मुकेश ऋषि, हेमंत पांडे, साहिल चड्ढा आणि दीपक पराशर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र पूनम धिल्लो यांनी या वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अनेक शानदार चित्रपटात केलं काम

पूनम यांनी 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘त्रिशूल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार आणि शशी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. त्यानंतर त्या काला पत्थर, नूरी, दर्द, तेरी कसम, यादगार, लेला, कयामत, गिरफ्तार, तेरी महरबानियां, कर्मा नाम आणि मालामाल अशा अनेक चित्रपटांत झळकल्या.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ