अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड

जवळपास 130 चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या या अभिनेत्रीला खासगी आयुष्यात मात्र पतीच्या फसवणुकीला सामोरं जावं लागलं. पतीचे दोन-चार नाही तर नऊ महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे.

अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
poojitha jonnalagadda
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 12:41 PM

फिल्म इंडस्ट्री लांबून अत्यंत झगमगणारी दिसते. पडद्यावर जे कलाकार चेहऱ्यावर हास्य आणून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत, त्यांचं वैयक्तिक आयुष्यातही सुख-समाधानाने समृद्ध असले, असं अनेकांना वाटतं. परंतु इंडस्ट्रीत असेही अनेक स्टार्स आहेत, ज्यांना त्यांच्या खासगी आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये अनेकदा फसवणूक, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यांसारख्या कथा आपण नेहमीच पाहतो, परंतु एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यात हे सर्व घडल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे पूजिता जोन्नालगड्डा. पूजिताने तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जवळपास 130 चित्रपटांमध्ये काम केलं. फक्त तेलुगू भाषेतच तिने 70 हून अधिक चित्रपट केले आहेत. परंतु करिअरमधील हे यश तिला तिच्या खासगी आयुष्यात मन:शांती देऊ शकलं नाही.

पूजिताने पडद्यावर अनेकदा दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती, परंतु खऱ्या आयुष्यातसुद्धा तिला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. तिने विजय गोपालशी लग्न केलं होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सर्वकाही चांगलं होतं. या दोघांना एक मुलगा आहे. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. पूजिताने तिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पती विजय गोपालचे दोन-तीन नव्हे तर नऊ वेगवेगळ्या महिलांसोबत अनैतिक संबंध होते, असा धक्कादायक आरोप पूजिताने केला.

ज्या व्यक्तीसोबत ती 14 वर्षांपासून होती, तीच व्यक्ती तिच्या नकळत फसवणूक करत होती. मुलगा जेव्हा 7 वर्षांचा होता, तेव्हाच विजय तिला सोडून गेला, असं तिने सांगितलं. विजय गोपालने दुसरं लग्न केलं. हे प्रकरण फक्त फसवणुकीपर्यंत मर्यादित नव्हतं, तर पूजिताने विजयवर आर्थिक शोषणाचाही आरोप केला आहे. विजयने तिच्या घरातून जवळपास 2.5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले, असा आरोप तिने केला. पतीचे हे कारनामे उघड झाल्यानंतर पूजिता एकटीच तिच्या मुलाचा सांभाळ करतेय. तिची ही मुलाखत व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us