Prabhas: प्रभासच्या अतिउत्साही चाहत्यांचा कहर; थिएटरमध्ये आणले फटाके अन्..

थिएटरमध्ये प्रभासच्या चाहत्यांचा गोंधळ; टळला मोठा अनर्थ

Prabhas: प्रभासच्या अतिउत्साही चाहत्यांचा कहर; थिएटरमध्ये आणले फटाके अन्..
Prabhas in AdipurushImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 12:35 PM

आंध्रप्रदेश- आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी चाहते कधी काय करतील याचा नेम नाही. बाहुबली स्टार प्रभासच्या (Prabhas) चाहत्यांनी रविवारी चक्क थिएटरमध्ये फटाके फोडले. आंध्रप्रदेशच्या थिएटरमधील (Movie Theatre) ही घटना आहे. प्रभासच्या एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले. यानंतर थिएटरमध्ये एकच गोंधळ झाला. अखेर प्रेक्षकांना थिएटरमधून बाहेर पडावं लागलं होतं. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र थिएटरचं मोठं नुकसान झालं.

ही घटना आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ताडेपल्लीगुडेम कस्बे इथली आहे. रविवारी प्रभासचा वाढदिवस होता. यानिमित्त त्याच्या ‘बिल्ला’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान अतिउत्साही चाहत्याने व्यंकटरमण थिएटरच्या आत फटाके फोडले.

फटाक्यांमुळे थिएटरच्या सीटला आग लागली आणि हळूहळू ही आग पसरू लागली. आग वाढू लागल्यावर थिएटरच्या आता गोंधळ सुरू झाला आणि चाहते बाहेरच्या दिशेने धावू लागले. थिएटरच्या कर्मचाऱ्यांना वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. मात्र यात थिएटरचं खूप नुकसान झालं.

प्रभासचा बिल्ला हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. प्रभासच्या वाढदिवसानिमित्त बिल्ला या चित्रपटाला पुन्हा एकदा आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या काही थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाची निर्मिती प्रभासचे दिवंगत काका कृष्णम राजू यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं.

काकांच्या निधनामुळे प्रभासने यावर्षी त्याचा वाढदिवस साजरा केला नाही. सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.