Radhe Shyam | महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे-श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, पाहा पूजा-प्रभासचा रोमँटिक अंदाज

आज देशभरात महाशिवरात्रीची धामधूम आहे. या खास प्रसंगी प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांनी त्यांच्या ‘राधे श्याम’(Radhe Shyam) चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध केले आहे.

Radhe Shyam | महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे-श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, पाहा पूजा-प्रभासचा रोमँटिक अंदाज
राधे श्याम पोस्टर
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 12:20 PM

मुंबई : आज देशभरात महाशिवरात्रीची धामधूम आहे. या खास प्रसंगी प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांनी त्यांच्या ‘राधे श्याम’(Radhe Shyam) चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध केले आहे. प्रभासने आपल्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. चित्रपटाच्या या नव्या पोस्टरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडिया विश्वात चर्चेत आहे (Prabhas starrer upcoming movie radhe shyam new poster launch on the occasion of mahashivratri).

हा चित्रपट एक प्रेमकथा आहे, ज्यामध्ये आपण प्रभास आणि पूजा हेगडे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहोत. या चित्रपटात हे जोडपे प्रेमाची एक अनोखी बाजू मांडताना दिसणार आहेत. प्रभास आणि पूजा चित्रपटाच्या पोस्टरवर एकत्र झळकले आहेत. चाहत्यांना हे नवीन पोस्टर खूप आवडले आहे. आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले, ‘महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर #RadheShyam चे नवीन पोस्टर तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यात मला आनंद होत आहे.’

प्रभासने शेअर केले चित्रपटाचे पोस्टर

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

(Prabhas starrer upcoming movie radhe shyam new poster launch on the occasion of mahashivratri)

या नव्या पोस्टरची पार्श्वभूमी रोमची आहे. कारण, चित्रपटाचे चित्रीकरण इटली आणि रोममध्येच झाले आहे. या आधी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्मात्यांनी या चित्रपटाची एक झलक मोशन पोस्टरसह प्रसिद्ध केली होती, जी लोकांना खूप आवडली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये बराच चर्चेत आहे.

सर्वात महागडा चित्रपट!

हा चित्रपट प्रभासच्या आयुष्यातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटातील प्रभासच्या केवळ वेशभूषावर निर्मात्यांनी 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. त्यामुळे यात काय खास असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत (Prabhas starrer upcoming movie radhe shyam new poster launch on the occasion of mahashivratri).

प्रभास आणि पूजाचा ‘राधे-श्याम’ हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राधेश्याम’ हा राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट असेल, तर गुलशन कुमार आणि टी-सीरीज हा चित्रपट सादर करेल. यूव्ही क्रिएशन्सद्वारे तयार केल्या गेलेल्या या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, सचिन खेडकर, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वंशी आणि प्रमोद यांनी केली आहे.

प्रभासची कारकीर्द

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता. प्रभासचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘राधे-श्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा डॅशिंग आणि स्टाइलिश लूक दिसला होता.

(Prabhas starrer upcoming movie radhe shyam new poster launch on the occasion of mahashivratri)

हेही वाचा :

Sonu Sood | ‘एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण चुकणार नाही!’ सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!

TMKOC | ‘तारक मेहता…’च्या ‘रीटा रिपोर्टर’चा बिकिनीत जलवा, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो शेअर करत म्हणाली…

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.