Pravin Tarde : मुंबईत छोटासा नट गेला तरी…नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडकर गैरहजर, संतापला मराठी अभिनेता
Marathi Actor On Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड कलाकार गैरहजर होते. यावर मराठी अभिनेता संतापला असून त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला राजकीय मान्यवरांसह इंडस्ट्रीतले अनेक दिग्गज उपस्थित होते. नानांनी बॉलिवूडही गाजवलेलं. पण, नानांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार गैरहजर होते. फक्त जॅकी श्रॉफ सोडले तर कोणताही बॉलिवूड कलाकार नानांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित नव्हता. अशातच आता यावर अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रवीण तरडेंनी व्यक्त केला संताप
प्रवीण तरडे म्हणाले की, ‘बॉलिवूडवाले अंत्यसंस्काराला आले नाहीत म्हणून नानाचं मोठेपण कमी होत नाही. नानापेक्षा बॉलिवूड मोठं नाही. नाना खूप मोठे होते. नानांच्या अंत्ययात्रेला काही हजार शेतकरी आले होते, त्यांच्या अंगाला घामाचा, मातीचा वास होता. बॉलिवूडमधल्या परफ्युम मारलेल्या कोणापेक्षा तो शेतकरी महत्त्वाचा आहे.’
प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, ‘माझ्या मते धुळ्यातून आलेला शेतकरी बॉलिवूडमधल्या हिरोंपेक्षा खूप मोठा आहे. आम्हाला फरक पडत नाही. नाना कधी म्हणाला, मी बॉलिवूडचा आहे वगैरे…नाना नेहमी म्हणायचा मी शेतकरी आहे…’
‘माझी तक्रार म्हणाल तर तक्रार आहेच, अंत्यसंस्काराला बॉलिवूडवाल्यांनी यायला पाहिजे होतं. निदान ज्यांना नानानं मित्र म्हटलं, त्यांनी तरी यायला हवं होतं. जॅकी श्रॉफ, सुरेश वाडकर हे आले होते. मुंबईत छोटासा नट गेला, तरी पांढरे कपडे घालून रांगा लागतात, पण ठीक आहे, शेतकरी आले होते, आम्हीही आलो होतो…’ असंही प्रवीण तरडे शेवटी म्हणाले. एबीपी माझाच्या ‘कॉफी विथ कौशिक’ कार्यक्रमात प्रवीण तरडे बोलत होते.
दरम्यान, ७५ वर्षीय नाना पाटेकर यांचं गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मृत घोषित करण्यापूर्वी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला होता. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदनाचे आदेश देण्यात आले होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे, पाटेकर यांनी ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
