‘दिव्या भारती मरणार’, अभिनेत्रीच्या मृत्यूची भविष्यवाणी, बहिणीकडून शॉकिंग खुलासा

Divya Bharti Death: दिव्या भारतीची चुलत बहीण कायनात अरोरा हिने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. दिव्याच्या मृत्यूची भविष्यवाणी तिच्या बालपणातच करण्यात आली होती आणि तिच्या आईला विश्वास होता की ती अभिनेत्री परत येईल... असा दावा कायनात हिने केला आहे...

दिव्या भारती मरणार, अभिनेत्रीच्या मृत्यूची भविष्यवाणी, बहिणीकडून शॉकिंग खुलासा
| Updated on: Sep 25, 2025 | 3:17 PM

Divya Bharti Death: 5 एप्रिल 1993 रोजी अभिनेत्रीने दिव्या भारती हिने अखेरचा श्वास घेतला आणि तिच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. फार कमी काळात दिव्या भारती हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण जेव्हा अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. दिव्या भारती हिची चुलत बहीण कायनात अरोरा हिने अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा केलेला. दिव्या हिच्या मृत्यूची भविष्यवाणी लहानपणीच झाली होती…

दिव्या भारती हे सिनेविश्लातील एक प्रसिद्ध नाव होतं, परंतु अभिनेत्रीचं निधन खूप कमी वयात झालं. पण तिच्या चुलत बहिणीने आता खुलासा केला आहे की अभिनेत्रीच्या मृत्यूची भविष्यवाणी करण्यात आली होती. नुकताच झालेल्या मुलाखतीत दिव्याची बहीण कायनात अरोरा हिने अभिनेत्रीच्या जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. जेव्हा कायनात हिने सिनेविश्वात पदार्पण केलं तेव्हा, तिची भेट दिव्याच्या आईसोबत झाली.

यादरम्यान, कायनात हिने खुलासा केला की दिव्याच्या आईने सांगितलं होतं की, जेव्हा ती अभिनेत्री 8 वर्षांची होती तेव्हा एका पुजाऱ्याने एक धक्कादायक खुलासा केला होता. पुजाऱ्याने दिव्याचं निधन फार कमी वयात होईल असं सांगितलं होतं. तेव्हा दिव्याच्या आई – वडिलांनी अनेकदा पूजा केली. पण काही वर्षानंतर त्यांच्या यावर विश्वास बसत नव्हता… त्यामुळे त्यांनी पूजा करणं बंद केलं… या गोष्टीवर अधिक लक्ष दिलं नाही…

पण, अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर, दिव्या भारतीच्या आईने पुन्हा त्या पुजाऱ्याला शोधलं आणि पुजाऱ्याला सांगितलं, तुम्ही सांगितलेलं भाकित खरं ठरलं…’ आता पुढे काय होईल असा प्रश्न देखील दिव्याच्या आईने पुजाऱ्याला विचारला… तेव्हा पुजारी म्हणाला, ‘दिव्या परत येईल…’, पुढे कायनात म्हणाली, ‘जेव्हा मी दिव्याच्या आईला भेटले, तेव्हा त्या मला म्हणाल्या माझी दिव्या परत आली…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कायनात अरोरा हिची चर्चा रंगली आहे.

दिव्या भारती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 9 वीत असताना दिव्या भारतीने शिक्षण सोडलं आणि मॉडेलींगला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी दिव्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॉडेल म्हणून नावारुपास आली. त्यानंतर दिव्याने तेलूगू ‘बोब्बिली राजा’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. ज्यामुळे दिव्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.