प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, डॉक्टर काय म्हणाले?

Bollywood Actor Prem Chopra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे... लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांच्या कुटुंबियांनी हेल्थ अफडेट दिली आहे.

प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, डॉक्टर काय म्हणाले?
प्रेम चोप्रा
| Updated on: Nov 16, 2025 | 1:51 PM

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना देखील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली. धर्मेंद्र यांच्यावर सध्या राहत्या घरी उपचार सुरु असून, प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर प्रेम चोप्रा यांना 8 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतंय. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेम चोप्राच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लीलावती रुग्णालयात उपचारानंतर त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आलं. प्रेम चोप्राने “प्रेम नगर,” “उपकार,” आणि “बॉबी” सारख्या क्लासिक चित्रपटांद्वारे इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत, काही नकारात्मक भूमिकांमुळे प्रेम चोप्रा यांनी परदेशातही लोकप्रियता मिळवली. एका जुन्या मुलाखतीत, प्रेम चोप्रा यांनी खुलासा केला की, त्यांना फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांच्या प्रतिष्ठित सिनेमात ‘द गॉडफादर’ ला श्रद्धांजली वाहणाऱ्या हॉलिवूड सिनेमात गॉडफादरची भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती.

प्रेम चोप्रा यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ‘उपकार’, ‘बॉबी’, ‘दो अनजाने’, ‘क्रांती’ यासारख्या प्रसिद्ध सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. प्रेम चोप्रा यांनी तब्बल 60 वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं. त्यांनी तब्बल 350 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2023 मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती

 

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या धर्मेंद्र यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरु आहे. तर धर्मेंद्र यांचे कुटुंबिय अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवत आहेत. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा ईशा देओल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती.