
अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता प्रियांका एका सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत आली आहे. प्रियांका फार क्वचित सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट करते. पण गेल्या दोन दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट करत आहे. नेहमी पती निक जोनस आणि लेक मालतीमेरी हिच्यासोबत फोटो पोस्ट करणाऱ्या प्रियांकाने आता क्रिप्टिक पोस्ट केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रियांकाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
43 वर्षीय प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये तिने स्वाभिमान आणि सीमा निश्चित करण्याबद्दल देखील लिहिलं आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर, प्रियांकाने अचानक अशी पोस्ट का लिहिली हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांना देखील आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणते, ‘मी सर्वात चांगलली आणि समजूतदार व्यक्ती आहे, पण जर तुम्ही माझा अनादर केलात तर तुम्हाला समजेल की आयुष्यात माझे फक्त तीन मित्र का आहेत. या मेसेजला आणखी कोणी संबंधित आहे का? तो खूप वैयक्तिक आणि संबंधित वाटतो.’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.
ही पहिली वेळ नाही जेव्हा प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. प्रियांका हिने अभिनेत्री रेखा यांचा एक फोटो पोस्ट केलेला आणि कॅप्शनमध्ये ‘बेटर ए बिच देन बेचारी…’ असं लिहिलं होतं. तेव्हा देखील प्रियांकाची पोस्ट चर्चेत आली होती. पण या माध्यमातून ती कोणाला लक्ष्य करत होती की या कॅज्युअल पोस्ट होत्या हे निश्चित होऊ शकले नाही. मात्र, चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की, प्रियांकाला कोणी फसवले आहे का?
प्रियांका चोप्रा हिच्या सिनेमांबद्दल सांगायतं झालं तर प्रियांका नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड सिनेमात दिसली. आता ती एसएस राजामौली यांच्या ‘एसएसएमबी 29’ या सिनेमात दिसणार आहे, ज्याच्या शूटिंगसाठी ती सध्या हैदराबादमध्ये आहे. पृथ्वीराज सुकुमारन आणि महेश बाबू देखील यात दिसणार आहेत.