लग्नानंतर सहा महिन्यातच गरोदर असल्याची चर्चा, प्रियांका चोप्रा म्हणते....

न्यूयॉर्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले आहेत. पण प्रियांका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता खुद्द प्रियांका चोप्रानेच मौन सोडलंय. प्रियांका सध्या अमेरिकेत आहेत. तिथे तिने एका न्यूज पोर्टलशी बोलताना गरोदरपणाच्या चर्चांवर मनमोकळेपणाने उत्तर दिलं. आई बनण्याची कायमच इच्छा असल्याचं प्रियांका म्हणाली. पण देवाची …

लग्नानंतर सहा महिन्यातच गरोदर असल्याची चर्चा, प्रियांका चोप्रा म्हणते....

न्यूयॉर्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले आहेत. पण प्रियांका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता खुद्द प्रियांका चोप्रानेच मौन सोडलंय. प्रियांका सध्या अमेरिकेत आहेत. तिथे तिने एका न्यूज पोर्टलशी बोलताना गरोदरपणाच्या चर्चांवर मनमोकळेपणाने उत्तर दिलं.

आई बनण्याची कायमच इच्छा असल्याचं प्रियांका म्हणाली. पण देवाची इच्छा असेल तेव्हा आई होईल, असं तिने सांगितलंय. यापूर्वी निक जोनासनेही यावर मौन सोडलं होतं. खरं स्वप्न तर हेच असतं, मी जरा लवकरच मोठा झालोय असं वाटतं. तुम्ही या गोष्टी दोन पद्धतीने घेऊ शकता, एकतर तुम्ही अनफेअर म्हणा किंवा कमी वयात मिळालेले अनुभव सकारत्मकदृष्ट्या पाहा. मी कमी वयात बरंच काही शिकलंय आणि माझ्या मुलांशी सगळं काही शेअर करण्याची इच्छा असल्याचं निक म्हणाला होता.

 

 

View this post on Instagram

 

Sometimes u just have to sneak it in!! @nickjonas ❤️??

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

दरम्यान, नुकतंच मेट गाला या इव्हेंटमधील प्रियांका चोप्राचा लूक चर्चेत आला होता. या लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि प्रियांकाला ट्रोलही करण्यात आलं. प्रियांकाने एलिस इन वंडरलँडचा लूक धारण केला होता.

 

 

View this post on Instagram

 

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *