
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर विदेशात स्थायिक झाली. अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत तिने लग्न केले. निक आणि प्रियांका यांची एक मुलगी असून प्रियांकाने तिचे नाव मालती मेरी ठेवले आहे. प्रियांका विदेशात असली तरीही ती कायमच भारतात येते. शिवाय विदेशात राहूनही ती भारतीय सण साजरे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत करते. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीचे अपडेट शेअर प्रियांका करते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती बॉलिवूडबद्दल काही धक्कादायक खुलासे करताना दिसली. प्रियांका चोप्रा हिच्यासोबतच तिच्या बहिणी देखील चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसतात. प्रियांकासोबत परिणीती चोप्रा आणि मनारा चोप्रा बॉलिवूड क्षेत्रात आहेत. प्रियांकासारखाच त्यांनीही ठसा उमटवला आहे.
बिग बॉसच्या घरात मनारा चोप्रा ही धमाल करताना दिसली. हेच नाही तर मनारा बिग बॉसच्या घरात असताना प्रियांका चोप्रा तिचा सपोर्ट करताना दिसली. बिग बॉसच्या घरातून मनारा बाहेर आल्यानंतर तिला प्रियांका चोप्रा आणि निक यांनी फोन करत तिच्या खेळाचे काैतुक केले. मनारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आता मनारा चोप्रा हिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
आता मनारा चोप्रा थेट मस्जिदमध्ये पोहोचली आहे. मनारा हिचा मस्जिदमधील व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. मनारा हिने हिजाबसोबतच बुरखा घातल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. यासोबतच मागे अजान सुरू असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकून येत आहे. हेच नाही तर अल्लाह एक आहे आणि सर्वत्र आहे, असेही म्हणताना ती दिसली. एक व्हिडीओ तिने सेल्फी कॅमेऱ्याने शूट केला असून मस्जिद दाखवण्याचा प्रयत्न मनारा चोप्रा करत आहे.
मनारा चोप्राचा हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला. हेच नाही तर मनाराच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत थेट म्हटले की, मनारा बहुतेक मुस्लीम धर्म स्वीकारणार आहे. दुसऱ्याने म्हटले की, हे सर्व करण्याची काय गरज आहे. मनारा चोप्रा मस्जिदमध्ये नेमकी कोणासोबत गेली याबद्दल फार काही माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, लोक तिला खडेबोल सुनावत आहेत.