AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra हिची जाऊबाई पतीमुळे अडचणीत, प्रेग्नेंसीमध्ये Joe Jonas पत्नीसोबत करायचा असं काम

Priyanka Chopra | प्रियांका चोप्राची जाऊबाई घेणार घटस्फोट! सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्यानात्याबद्दल मोठी गोष्ट समोर; प्रेग्नेंसीमध्ये प्रियांकाच्या जाऊबाईने केलाय अनेक संकटांचा सामना

Priyanka Chopra हिची जाऊबाई पतीमुळे अडचणीत, प्रेग्नेंसीमध्ये Joe Jonas पत्नीसोबत करायचा असं काम
| Updated on: Sep 08, 2023 | 3:19 PM
Share

मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नर आणि पॉप सिंगर जो जोनस यांच्या नात्याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे सोफी टर्नर आणि जो जोनस यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. घटस्फोटाचा खुलासा सोफी टर्नर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. सध्या सर्वत्र सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अनेक म्यूझिकल इव्हेंट्समध्ये सोफी पती जो जोनस याच्यासोबत दिसत होती. पण अचानक दोघे विभक्त होत असल्याच्या चर्चा रंगल्या आणि दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं..

सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या नात्याबद्दल आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. सोफीच्या पार्टी करण्याच्या सवयीमुळे जो जोनस त्रासलेला होता. सोफी हिला तिचं आयुष्य तिच्या मनाने जगायचं होतं. असं काहींचं म्हणणं आहे. असं असताना सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या नात्याबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे सांगण्यात आहे की, जो जोनस एक पती म्हणून चांगला नव्हता. रिपोर्टनुसार, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येवू लागल्या अशा देखील अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. प्रग्नेंसी दरम्यान देखील सोफी पती जो जोनस याच्यासोबत आनंदी नव्हती. अशी माहिती देखील समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोफी हिला घरातून बाहेर निघणं, इव्हेंटसाठी जाणं, फोटो काढणं बिलकूल आवडत नव्हतं. पण सोफी प्रत्येक इव्हेंटमध्ये सोबत असावी यासाठी जो जोनस पत्नीवर बळजबरी करायचा. पतीची वागणूक पाहून सोफीला पतीसोबत इव्हेंटमध्ये जावं लागत होतं. पण दिवस त्रासलेल्या सोफी हिने रागात जो जोनस याला नकार दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या वैवाहिक नात्यात अडचणी येत आहेत… अशी माहिती सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या जवळच्या मित्रांकडून समोर येत आहेत. त्यामुळे सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.

सोफी टर्नर आणि जो जोनस यांचं लग्न

सांगायचं झालं तर, सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात 2016 मध्ये झाली. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. अखेर सोफी आणि जो यांनी 1 मे 2019 रोजी गुपचूप लग्न केलं. दोघांना दोन मुली आहे. पण आता दोघांचं नातं शेवटच्या टप्प्यावप पोहोचलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?