Video : थेट भर कॉन्सर्टमध्ये ‘या’ व्यक्तीने घेतली प्रियांका चोप्रा हिची किस, तो व्हिडीओ तूफान व्हायरल
प्रियांका चोप्रा ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आली. प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. प्रियांका चोप्रा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही भारतात नाही तर विदेशात आपल्या मुली आणि पतीसोबत राहते. प्रियांका चोप्रा ही जरी भारतामध्ये नसली तरीही ती आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनस यांच्यासोबत भारतामध्ये आली.
प्रियांका चोप्रा ही तिची चुलत बहीण परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठीही भारतामध्ये आली. यावेळी काही विधी पार पाडताना देखील साखरपुड्यात प्रियांका चोप्रा दिसली. काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीसोबतचे अत्यंत खास फोटो हे प्रियांका चोप्रा हिने शेअर केले. यावेळी प्रियांका चोप्रा ही मालतीसोबत खास वेळ घालवताना दिसली. मालती तिच्या मित्रांसोबत खेळत फोटोमध्ये दिसली.
प्रियांका चोप्रा हिचा पती निस जोनस याचा वाढदिवस 16 सप्टेंबर रोजी पार पडलाय. यावेळी निक जोनस याचा कॉन्सर्ट अमेरिकेच्या ओमाहा येथे पार पडला. या कॉन्सर्टमध्ये निस जोनस याने आपला वाढदिवस हजारो चाहत्यांसोबत साजरा केला. प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्या जवळपास सर्वच कॉन्सर्टमध्ये उपस्थित असते. पतीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉन्सर्टमध्ये प्रियांका पोहचते.
View this post on Instagram
आता सध्या निक जोनस याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये थेट कॉन्सर्टमध्येच पत्नीच्या जवळ येत निक जोनस प्रियांका चोप्रा हिची किस घेताना दिसतोय. स्टेजच्या बाजूला येऊन निक हा प्रियांकाची किस घेतो. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. अनेकजण हा व्हिडीओ पाहून प्रियांका चोप्रावर निक किती जास्त प्रेम करतो हे सांगताना दिसत आहेत.
निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांचा हा व्हिडीओ सर्वांनाच आवडला असून लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. प्रियांका चोप्रा हिने निक जोनस याच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत खास पोस्ट लिहिली. या पोस्टच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, निक जोनस याच्यावर ती किती जास्त प्रेम करते. इतकेच नाही तर योग्य रस्ता देखील निक जोनस यानेच आपल्याला दाखवल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले.
