AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियंका गांधी यांच्या पीएविरोधात FIR; ‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतमने लावले गंभीर आरोप

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्या पीएविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक अर्चना गौतमला धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रियंका यांच्या पीएनं अर्चनाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली.

प्रियंका गांधी यांच्या पीएविरोधात FIR; 'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतमने लावले गंभीर आरोप
Archana Gautam and Priyanka GandhiImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 27, 2024 | 10:54 PM
Share

नवी दिल्ली : ‘बिग बॉस 16’ची माजी स्पर्धक अर्चना गौतमला धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्या पीएविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एससी एसटी ॲक्टअंतर्गत केस दाखल केली आहे. प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंहविरोधात तक्रार मिळाल्याची माहिती मेरठच्या पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. प्रियंका गांधी यांच्या पीएनं अर्चना गौतमला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली. अर्चनाने काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या महिन्यात रायपूरमध्ये पक्षाच्या अधिवेशनात तिने भाग घेतला होता. त्याचवेळी संदीप सिंह यांनी धमकावल्याची तक्रार तिने केली आहे. याशिवाय त्यांनी जातीवाचक अपशब्द वापरल्याचाही आरोप अर्चनाने केला आहे.

26 फेब्रुवारी रोजी अर्चनाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली होती. “मला समजत नाही की अशा लोकांना ते का ठेवत आहेत, जे पक्षालाच आतून पोखरण्याचा प्रयत्न करत आहेत. संदीप सिंह यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे संदेश प्रियंका गांधी यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत”, असं अर्चना या लाइव्हमध्ये म्हणाली होती. संदीप यांनी पोलीस लॉकअपमध्ये डांबवण्याचीही धमकी दिल्याचा आरोप तिने केला.

मेरठच्या पोलिसांनी संदीप सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (डी) आणि 3 (1) अंतर्गत परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

“माझी मुलगी प्रियंका गांधी यांच्या निमंत्रणानंतर काँग्रेसच्या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी रायपूरला गेली होती. त्यांना भेटण्यासाठी तिने पीए संदीप सिंह यांच्याकडे वेळ मागितला होता. परंतु त्यांनी प्रियंका गांधी यांच्याशी तिची भेट करून देण्यास नकार दिला. इतकंच नव्हे तर अर्चनाशी उद्धटपणे बोलत त्याने जातीवाचक टिप्पणी आणि असभ्य भाषेचा वापर केला. तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली”, असे आरोप अर्चनाचे वडील गौतम बुद्ध यांनी केले आहेत. अर्चनाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मेरठ शहराचे एसपी पियुष सिंह यांनी दिली.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!