AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सायको-थ्रिलर’ चित्रपट जे मेंदूला हादरवतात; ट्विस्ट तर असे जबरदस्त की कधी विचारही नसेल केला

ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त असे सायको-थ्रिलर चित्रपट उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक चित्रपटाची कथा आणि कथानक वेगवेगळे असून ते प्रेक्षकांना रोमांच आणि धक्के देणारे आहेत.

'सायको-थ्रिलर' चित्रपट जे मेंदूला हादरवतात; ट्विस्ट तर असे जबरदस्त की कधी विचारही नसेल केला
| Updated on: Dec 01, 2024 | 5:44 PM
Share

OTT प्लॅटफॉर्मवर जवळपास सर्वच जॉनरचे चित्रपट पाहायला मिळतात. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जो-तो चित्रपट बनवत असतो. कोणाला हॉरर, कोणाला कॉमेडी तर कोणाला सायको-थ्रिलर चित्रपट आवडतात. जर तुम्हालाही असे ‘सायको-थ्रिलर’ चित्रपट पाहायला आवडत असतीस आणि त्याची यादी तुम्ही शोधत असाल तर हे चित्रपट तुमच्यासाठी खजिनाच ठरेल.

‘पोशाम पा’

त्यातील पहिला चित्रपट आहे ‘पोशाम पा’. 2019 मध्ये रिलीज झालेला सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट ‘पोशाम पा’. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. अंजना गावीत आणि तिच्या दोन मुलींच्या गुन्हेगारीबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्यांच्यावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. सुमन मुखोपाध्याय दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. अंजना आणि तिच्या दोन मुली सीमा आणि रेणुका यांनी 1996 मध्ये 40 हून अधिक मुलांचे अपहरण केले आणि सुमारे 12 मुलांची हत्या केली. सीमा आणि रेणुका यांना 2014 मध्ये 12 मुलांच्या सामूहिक हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झाली, तर त्यांची आई अंजनाचा तुरुंगात शिक्षा भोगत असताना 1997 मध्ये मृत्यू झाला. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे. चित्रपटात माही गिल, सयानी गुप्ता आणि रागिनी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.

‘रत्सासन’

2018 मध्ये रिलीज झालेल्या तामिळ भाषेतील ‘रत्सासन’ या क्राईम थ्रिलर चित्रपटाची कथा तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. यामध्ये अरुण नावाचा तरुण चित्रपट निर्माता होण्याचे स्वप्न सोडून पोलीस अधिकारी बनतो. त्यानंतर तो शाळकरी मुलींची शिकार करणाऱ्या सायको किलरला पकडण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. त्यावेळी या चित्रपटातील काह ट्वीस्ट आणि टर्न नक्कीच धक्का देणार आहेत.

‘बारोट हाऊस’

2019 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बारोट हाऊस’ हा देखील एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे.ही कथा अमित बारोट आणि त्यांच्या कुटुंबाची आहे. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या एका मुलीचा खून होतो, काही वेळाने दुसऱ्या मुलीचाही खून होतो आणि याचा संशय त्यांचा मुलगा मल्हारवर येतो. त्यानंतर कथा वेगळ्याच मार्गाने फिरते. तेव्हा या चित्रपटातील सस्पेंस पाहायला अतिशय रंजक वाटतात. ZEE5 वर बारोट हाऊस चित्रपट उपलब्ध आहे.

‘सायको’

‘सायको’ हा 2020 च्या या तमिळ चित्रपट असून एक आंधळा प्रियकर त्याची प्रेयसीला वाचवण्यासाठी काय काय करतो, जिचे एका मनोरुग्ण किलरने अपहरण केलेले असते. हे सर्व पाहताना उत्सुकता वाढते. हा रोमांचक चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

‘कला’

2022 मध्ये रिलीज झालेला ‘कला’ हा चित्रपट पीरियड सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. या चित्रपटात एका गायिकेची कथा सांगण्यात आली आहे. जी तिच्या आईशी संघर्ष करत असते . चित्रपटातून आई-मुलीचे गुंतागुंतीचे नाते समोर येते. हा चित्रपट तुमच्या हृदयावर आणि मनावर खोल छाप नक्कीच सोडेल. चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

‘फ्रेडी’

‘फ्रेडी’ हा 2022 चा हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. फ्रेडी नावाच्या एका विचित्र डेंटिस्टची ही कथा आहे. फ्रेडी एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतो, मात्र नातेसंबंधात लपलेली रहस्ये आणि फ्रेडीने त्यासाठी उचललेलं पाऊल हे सर्वकाही पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा चित्रपट Disney + Hotstar वर पाहता येईल.

‘अगली’

2013 मध्ये रिलीज झालेला ‘अगली’ चित्रपट तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. ही कथा एका संघर्ष करणाऱ्या अभिनेत्याची आहे, ज्याच्या मुलीचे अपहरण होते. तो अपहरणकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्याला कळतं की आपलेच लोक आपल्या विरोधात आहेत. त्यानंतर चित्रपटात येणारा ट्विस्ट जबरदस्त आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.