AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या ex मेहुण्यासोबत रिलेशनशीपमध्ये, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची कबुली

'पागलपंती' चित्रपटातील सहकलाकार आणि बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट याला डेट करत असल्याची कबुली कृती खरबंदाने दिली.

सलमान खानच्या ex मेहुण्यासोबत रिलेशनशीपमध्ये, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची कबुली
| Updated on: Nov 19, 2019 | 10:34 AM
Share

मुंबई : बॉलिवूड कलाकार सहसा आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं टाळतात. अगदी रणवीर-दीपिका असो किंवा आलिया-रणबीर, अनेकांनी आपलं खाजगी आयुष्य लपवलं. अनुष्का, दीपिका यांनी तर थेट लग्नाची पत्रिका देऊनच चाहत्यांना चकित केलं होतं. परंतु नव्या दमाची बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा (Kriti Kharbanda) याला अपवाद ठरली आहे. ‘पागलपंती’ (Pagalpanti) चित्रपटातील सहकलाकार आणि बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) याला डेट करत असल्याची कबुली कृतीने (Pulkit Samrat Dating) दिली.

पुलकित हा सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी पाच वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकला होता. मात्र वर्षभराच्या आतच, म्हणजे 2015 मध्ये श्वेता-पुलकितचा घटस्फोट झाला. त्यानंतर पुलकितचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं.

पुलकित आणि कृती यांच्या अफेअरच्या चर्चाही जोरदार होत्या. अखेर कृतीने या चर्चांना पूर्णविराम देत अळीमिळी गुपचिळी सोडली. जगासमोर आपल्या नात्याची घोषणा करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांना ही बातमी सांगण्याची इच्छा असल्यामुळे हा लपवाछपवीचा खेळ खेळल्याचं कृती म्हणाली.

‘नाही, या अफवा नाहीत. आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. मी कोणाला तरी डेट करत आहे, हे सर्वप्रथम मला माझ्या पालकांना सांगण्याची इच्छा होती. तुम्हाला आपल्या रिलेशनशीपची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. कधीकधी यास पाच वर्ष लागू शकतात, तर कधी पाच महिन्यांतच योग्य वेळ आल्याची जाणीव तुम्हाला होते. आमच्या बाबतीत, ते पाच महिन्यात घडलं. मी खूप आनंदात आहे आणि मी पुलकितला डेट करत असल्याचं सांगताना माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही’ असं कृती उत्साहाने सांगते.

‘आम्ही एकत्र किती हॉट दिसतो. आमची केमिस्ट्रीही खूप छान आहे आणि एकत्र आम्ही खूप क्यूट दिसतो. आम्ही रिलेशनशीपमध्ये आहोत, याचा कुणालाही अंदाज येईल. पुलकित माझ्यासाठी खूप खास आहे आणि नेहमीच असेल’ असं कृती खरबंदा भरभरुन बोलते.

BMW ठोकली, बापाकडे ऑडी मागितली, केआरकेच्या पोराचा प्रताप

पुलकित आणि कृती यांनी ‘वीरे की वेडिंग’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पुलकितने ‘क्योंकि सास भी..’ मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर फुक्रे, जय हो, बँगिस्तान, सनम रे असे अनेक चित्रपट (Pulkit Samrat Dating) केले आहेत.

कृती खरबंदाने जवळपास सात वर्ष दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर ‘राझ : रिबूट’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर कारवान, हाऊसफुल 4 यासारख्या चित्रपटात काम केलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.