BMW ठोकली, बापाकडे ऑडी मागितली, केआरकेच्या पोराचा प्रताप

'कार अपघातामुळे फैसलला आता बीएमडब्ल्यू कार चालवण्याची इच्छा नाही. आता फैसल ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हरची मागणी करतोय' असं केआरके म्हणतो

BMW ठोकली, बापाकडे ऑडी मागितली, केआरकेच्या पोराचा प्रताप

मुंबई : वादग्रस्त ट्वीट करुन चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची हौस असलेला बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके याच्या मुलाने आपली ‘बीएमडब्ल्यू’ कार ठोकली. मात्र आलिशान गाडीला अपघात (KRK Son BMW Accident) घडवून स्वस्थ न बसणाऱ्या त्याच्या मुलाने बापाकडे आता ऑडी किंवा रेंज रोव्हर गाडी देण्याची मागणी केली आहे.

केआरकेने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या मुलाने कारला अपघात केल्याची माहिती शेअर केली. या अपघातात केआरकेचा मुलगा फैसल याला कुठलीही दुखापत झालेली नाही. पण त्याच्या बीएमडब्ल्यू कारचं बरंच नुकसान झालं आहे.

‘फैसल ऑफिसला जात होता. आणि त्याने (हसत) गाडीचा अपघात केला आहे. मस्तच अॅक्सिडेंट केला (उपहासाने). ओहो. काही हरकत नाही’ असं केआरके व्हिडीओमध्ये बोलत असल्याचं ऐकू येतं.

‘कार अपघातामुळे फैसलला आता बीएमडब्ल्यू कार चालवण्याची इच्छा नाही. आता फैसल ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हरची मागणी करतोय. चांगली गाडी सुचवा’ असा सल्ला केआरकेने मागितला आहे.

ट्विटराईट्सनी मात्र केआरकेला भलतेच सल्ले दिले आहेत.

अभिनेता कमाल आर खानने ‘देशद्रोही’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वामध्ये तो सहभागी झाला होता.

नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू

ट्विटरवर बड्या सेलिब्रेटींपासून सर्वसामान्य नेटिझन्सपर्यंत कोणाशी ना कोणाशी तो नेहमीच पंगा घेत असतो. आक्षेपार्ह ट्वीट करत वाद ओढावून घेण्याची कमाल खानला हौसच (KRK Son BMW Accident) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *