‘आखिरी चेतावनी’, सेलिब्रिटींवर गँगस्टरची दहशत, सलमान खाननंतर प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार

House Firing: सलमान खान, एपी ढिल्लो यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार, 'या' गँगस्टरने स्वीकारली जबाबदारी..., गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटीवर होणाऱ्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे...

‘आखिरी चेतावनी’, सेलिब्रिटींवर गँगस्टरची दहशत, सलमान खाननंतर प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार
| Updated on: Feb 05, 2025 | 8:57 AM

House Firing: अभिनेता सलमान खान आणि गायक एपी ढिल्लो यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार झाला आहे. गोळीबारानंतर सेलिब्रिटींमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. कॅनडा येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पंजाबी गायक प्रेम ढिल्लो यांच्या घरावर गोळाबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार मंगळवारी रात्री झाला आहे. पण यामध्ये कोणालाही नुकसान झालेलं नाही. या हल्ल्याची जबाबदारी जयपाल भुल्लर टोळीशी संबंधित असलेला आणि सध्या ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी दहशतवादी अर्श दलाचा जवळचा मानला जाणारा जेंटा खरर याने स्वीकारला आहे.

जेंटा खरर याने व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये या घटनेची जबाबदारी घेतली आहे. पोस्टमध्ये पंजाबी संगीत इंडस्ट्रीतील वाढत्या प्रभावाचा आणि सिद्धू मूसवाला, जग्गू भगवानपुरिया यांसारख्या नावांचाही उल्लेख आहे. जर तो (प्रेम) सुधारला नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल, असे म्हणत जेंटाने प्रेम ढिल्लो याला अंतिम इशारा दिला आहे.

 

 

पोस्टमध्ये काय लिहिलंय?

जेंटाने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिद्धू मूसवालाच्या मृत्यूनंतर प्रेम ढिल्लोने विश्वासघात केला होता. मूसेवाला याला धमकी देण्यासाठी त्याने जग्गू भगवानपुरियाच्या टोळीशी संपर्क साधला होता. ढिल्लनचा ऑस्ट्रेलियातील शो रद्द करण्यामागे त्याच्या टोळीचा हात असल्याचेही जेंटाने म्हटलं आहे.
भविष्यात ढिल्लो याच्यावर हल्ले होण्याचा इशारा जेंटाने दिला आहे. प्रेम ढिल्लो यांचं पूर्ण नाव प्रेमजीत सिंह ढिल्लो असून त्यांचा जन्म अमृतसर येथे झाला. त्याला 2019 मध्ये सिद्धू मूसवालाच्या बूट कट या गाण्याने प्रसिद्धी मिळाली.

एपी ढिल्लोच्या घरावरही गोळीबार झाला आहे

काही महिन्यांपूर्वी पंजाबी गायक एपी ढिल्लो याच्या कनडा येथील घरवर गोळीबाराची घटना घटली होती. धक्कादायक घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई याने घेतली होती. याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली. पंजाबी संगीत उद्योगातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे. सुरक्षा यंत्रणा या घटनांचा गांभीर्याने तपास करत आहेत.

सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार

एप्रिल 2024 मध्ये सलमान खान याच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई याने घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्सचे गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.