AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे वाह! ‘पुष्पा 2’ आता OTTवर रिलीज होणार? या प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार

आज रिलीज झालेल्या "पुष्पा 2: द रूल" ने लोकांना वेड लावलं आहे. चाहत्यांसाठी चित्रपटाबाबत अजून एक आनंदाची बातमी आहे. "पुष्पा 2: द रूल" चित्रपट लवकरच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार याबद्दल जाणून घेऊयात.

अरे वाह! 'पुष्पा 2' आता OTTवर रिलीज होणार? या प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार
| Updated on: Dec 05, 2024 | 4:34 PM
Share

आज म्हणजे 5 डिसेंबर 2024 रोजी सर्वांना आतुरता असलेला ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. सर्वच शहरांतील थिएटर हाऊसफुल्ल असून तिकीटही मिळत नाहीयेत. अपेक्षेप्रमाणे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालणार असं दिसत आहे.

चित्रपट लवकरच OTT वर 

चाहत्यांसाठी आता या चित्रपटाबद्दल अजून एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट लवकरच आता तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्याबरोबर OTT रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच आता नेटफ्लिक्सवर पाहाता येणार आहे.

या चित्रपटाचे ओटीटीचे अधिकार नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतो. त्याच पद्धतीने आता हा चित्रपट देखील रिलीजच्या दीड ते दोन महिन्यांनी म्हणजेच 2025 मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येईल असा अंदाज आहे.

‘पुष्पा 2’ ऑनलाइन लीक झाल्यानं कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता

दरम्यान ‘पुष्पा 2’ ऑनलाइन लीक झाल्याचंही म्हटलं जात आहे. चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासातच चित्रपट लीक झाल्यानं निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो. ‘पुष्पा 2’ रिलीज झाल्यानंतर पायरसी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन लीक झाला आहे. आता लोक हा सिनेमा मोफत डाउनलोड करून पाहू शकतात. हा सिनेमा पायरसी प्लॅटफॉर्मवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये लीक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज सगळीकडे ‘पुष्पा 2’ चीच क्रेझ

आज सगळीकडे ‘पुष्पा 2’ चीच क्रेझ पाहायला मिळत आहे.  अल्लू अर्जुन व रश्मिकाची केमिस्ट्री  प्रेक्षकांना नक्कीच आवडली आहे, तर काहींना मल्याळम स्टार फहाद फाझीलच्या एंट्रीने आणि त्याच्या अभिनयाने वेड लावंल आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे शो पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले असून पुढील काही दिवस तरी सर्व थिएटर  हे हाऊसफुल्लच राहतील असं चित्र दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....