Race 4 : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?

Race 4 Movie Update : रेस 4 बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या फ्रँचायजीच्या 2 पार्ट्समध्ये सैफ अली खान झळकला, तर तिसऱ्या भागात सलमान खानने काम केलं, मात्र आता चौथ्या भागात कोणता स्टार झळकणार याची उत्सुकता वाढली आहे.

Race 4 : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?
रेस 4 बद्दल उत्सुकता वाढली
| Updated on: Aug 28, 2026 | 7:11 PM

Race 4 Movie Update : रेस फिल्म्सचे (Race ) आत्तापर्यंत आलेले भाग हे बहुचर्चित होते आणि या चित्रपटांचा अतिशय यशस्वी फ्रँचायजीत समावेश होतो. या फ्रँचायजीचे आत्तापर्यंत 3 भाग आले असून, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागात अभिनेता सैफ अली खान झळकला आणि दोन्ही पार्ट्स अतिशय यशस्वी ठरले. तर तिसऱ्या पार्टमध्ये दबंग स्टार सलमान खान होता, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता रेसच्या चौथ्या भागाबद्दल चर्चा सुरू झाली असून त्याचे अपडेट्स समोर येताना दिसत आहेत.

रेसच्या चौथ्या पार्टमध्ये बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान हा झळकणार असल्याची चर्चा असून तो सलमान खानला रिप्लेस करू शकतो. या चित्रपटाबद्दल सतत अपडेट्स समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, आमिरला या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील आवडली आहे.

रेस 4 मध्ये दिसणार आमिर खान ?

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान हा चित्रपटांबाबत अतिशय चोखंदळ आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने रेस 4 ची स्क्रिप्ट वाचली असून त्याला ती आवडली आहे, असं समजतं. त्यामुळे या चित्रपटात त्याने चांगलाच रस दाखवला असून दिग्दर्शक म्हणून विजय कृष्ण आचार्य ला घ्यावं अशीही त्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या चित्रपटाबद्दल बरंच डिस्कशन सुरू आहे. जर सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर आमिर खान हाच रेस फ्रँचायजीचा पुढला चेहरा ठरू शकतो. आणि सलमानच्या जागी तोच आगामी चित्रपटात दिसू शकतो.

बॉक्स ऑफीसवर कसा मिळाला रिस्पॉन्स ?

रेस फ्रँचायजीमधील पहिला भाग हा 2008 साली आला होता. रिपोर्ट्सनुसार, त्याचं बजेट 46 कोटी होती आणि चित्रपटाची एकूण कमाई 103 कोटी झाली. तर 2013 साली आलेला रेस टू हाही सुपरहिट ठरला आणि चित्रपटाने 173 कोटींचा गल्ला जमवला. यानंतर रेस 3 देखील मोठ्या पडद्यावर आला, ज्यात सलमान खान हा मुख्य भूमिकेत होता. 200 कोटींच्या बजेटमध्ये हा पार्ट बनला आणि त्याचं कलेक्शन 300 कोटींच्या आसपास झाल्यातं बोललं जातं. त्यामुळे आता रेस 4 कधी येतो आणि त्यात कोणता स्टार झळकतो याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.

 

Follow Us