Parineeti Chopra | ‘अनेकांचं बोलणं बंद झालं कारण…’, साखरपुड्यानंतर बदललं राघव चड्ढा यांचं आयु्ष्य!

अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर खासदार राघव चड्ढा यांच्या आयुष्यात झालेत मोठे बदल; सहकारी आणि वरिष्ठांबद्दल राघव यांचं मोठं वक्तव्य

Parineeti Chopra | अनेकांचं बोलणं बंद झालं कारण..., साखरपुड्यानंतर बदललं राघव चड्ढा यांचं आयु्ष्य!
| Updated on: Jul 28, 2023 | 8:56 AM

मुंबई | 28 जुलै 2023 : अभिनेता परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत हॉटेल बाहेर जेव्हा परिणीतीला स्पॉट करण्यात आलं, तेव्हा पासून अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. सुरुवातीचे काही दिवस परिणीती हिने राघव यांच्यासोबत असलेलं नातं स्वीकारलं नव्हतं. पण आता १३ मे रोजी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला. आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. पण लग्नाबद्दल अद्याप दोघांपैकी कोणीही वक्तव्य केलं नाही. पण परिणीती हिच्यासोबत सारखपुडा केल्यानंतर राघव यांच्या आयुष्यात मोठं बदल झाले आहेत. याबद्दल खुद्द राघव चड्ढा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत राघव चड्ढा म्हणाले, ‘मला वाटते की आपण काही गोष्टी राजकीय आघाड्यांपुरते मर्यादित ठेवल्या पाहिजे आणि वैयक्तिक आघाड्यांपुरते नाही. माझे पक्षातील सहकारी आणि वरिष्ठ मला आता चिडवत नाही. पूर्वीते मला कायम परीच्या नावाने खूप चिडवायचे…’

पुढे राघव चड्ढा म्हणाले, ‘पूर्वी लोकं माझ्यावर दबाव टाकायचे. सतत सांगायचे लवकर लग्न कर. माझा साखरपुडा झाल्यानंतर अनेकांचं बोलणं बंद झालं. आता त्यांचं चिडवणं देखील कमी झालं आहे. कारण मी लवकर लग्न करणार आहे.आता तुम्हाला यापेक्षा जास्त माहिती मिळणार नाही कारण याठिकाणी पक्षाबद्दल बोललो तर बरं होईल.’ असं देखील राघव चड्ढ म्हणाले.

परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं होत. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding)

परिणीतीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिनेमाचं शिर्षक अद्याप घोषित केललं नाही.

अभिनेत्री जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकमध्येच नाही तर, दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित अमर सिंग चमकीला यांच्या बायोपिकमध्ये देखील दिसणार आहे. सध्या सर्वत्र परिणीती तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे.