Gadar 2 | ‘आम्ही एकमेकांना ब्लॉक केलं पण…’, अमिषा पटेल हिच्या आयुष्यातील ‘त्या’ पुरुषाचं महत्त्व

'आम्ही कायम भांडतो; आम्ही एकमेकांना ब्लॉक केलं पण... ', अविवाहित अमिषा पटेल हिच्या आयुष्यातील 'त्या' पुरुषाचं महत्त्व; सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा...

Gadar 2 | 'आम्ही एकमेकांना ब्लॉक केलं पण...', अमिषा पटेल हिच्या आयुष्यातील 'त्या' पुरुषाचं महत्त्व
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 8:15 AM

मुंबई | 28 जुलै 2023 : अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र अमिषा पटेल आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आमिषा पटेल हिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. आता देखील अभिनेत्री तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या पुरुषासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. आमिषा पटेल हिच्या आयुष्यातील ‘तो’ पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून ‘गदर २’ सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा आहेत. सध्या सर्वत्र अनिल शर्मा आणि आमिषा पटेल यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

अनिल शर्मा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आमिषा म्हणाली. ‘आम्ही भांडतो.. व्हाट्सएप आणि सोशल मीडियावर एकमेकांना ब्लॉक देखील करतो.. पण आमचं नातं कधीही न तुटणारं आहे..पण आता आम्ही सोबत आहोत… आमचं नातं असचं आहे…’ एवढंच नाही तर, आमिषा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

व्हिडीओमध्ये अनिल शर्मा आमिषा पटेल हिचं कौतुक करताना दिसत आहेत.. ‘याठिकाणी आमची सकिना आली आहे.. मला कळत नाही, दिवसागणिक हिचं सौंदर्य वाढत आहे. वयाच्या या टप्प्यावर देखील अमिषाचं सौंदर्य कमी झालेलं नाही..’ सध्या अमिषा हिने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करत आमिषा हिने अनील शर्मा यांचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद अनिल शर्मा.. मला माहिती आहे मी तुमची फेवरेट आहे आणि कायम राहिल… काही संबंधांचं महत्त्व आपण शब्दात मांडू शकत नाही…’ असं अभिनेत्री व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणाली..

दरम्यान, आमिषा हिने काही दिवसांपूर्वी सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मेकअप आर्टिस्ट, डिझायनर आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही. पगाराशिवाय शूटिंगदरम्यान झालेला खर्च आणि विमान तिकीटासारखे बिलही मिळालं नाही. सर्व अडचणी पाहून झी स्टुडिओने सर्वांचे पैसे दिले. असे अरोप अमिषा हिने अनिल शर्मा यांच्यावर केले होते..

अनेक वर्षांनंतर अमिषा ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एका काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर अमिषा पटेल हिचा देखील बोलबाला होता. पण आता अभिनेत्रीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षेत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.