AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Bhatt : मी महेश भट्ट यांचा मुलगा नाही, राहुल भट्टचं वक्तव्य चर्चेत, सांगितल्या बालपणीच्या आठवणी

Rahul Bhatt On Mahesh Bhatt : दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टनं त्याच्या बालपणाबद्दल भाष्य केलं असून वडिलांसोबतच्या नात्याबद्दलही भाष्य केलं आहे.

Rahul Bhatt : मी महेश भट्ट यांचा मुलगा नाही, राहुल भट्टचं वक्तव्य चर्चेत, सांगितल्या बालपणीच्या आठवणी
| Updated on: Sep 29, 2026 | 6:45 PM
Share

चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचं आयुष्य अनेक वादांनी वेढलेलं होतं. या सगळ्याचा त्यांच्या मुलावरही परिणाम झालं. एका मुलाखतीत, राहुल भट्टनं आपल्या बालपणाबद्दल आणि वडिलांसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं. राहुल म्हणाला की, त्याच्या बालपणीच्या काळात त्याला वडिलांच्या उपस्थितीची आणि मार्गदर्शनाची उणीव जाणवली. राहुल हा महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण यांचा मुलगा आहे, तर अभिनेत्री पूजा भट्ट ही त्याची बहीण आहे.

राहुल लहान वयातच स्वतःला कुटुंबाचा प्रमुख मानू लागला. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला की, त्याचे आई-वडिल विभक्त झाल्यानंतर त्याला लहान वयातच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. राहुल म्हणाला की, तो स्वतःला कुटुंबाचा प्रमुख मानू लागला आणि त्याला आपल्या आई व बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी जाणवू लागली. बालपणी त्याला एका खंबीर पुरुष मार्गदर्शकाचा पाठिंबा मिळाला नाही, ज्याचा परिणाम नंतर त्याच्या वागणुकीवर झाला.त्यावेळी पूजा भट्टला चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळाली. जेव्हा कोणी त्याच्या बहिणीबद्दल अपमानास्पद कमेंट करायचे किंवा तिला अयोग्यरित्या काहीतरी म्हणायचे, तेव्हा राहुल अनेकदा हिंसक प्रतिक्रिया द्यायचा.

आपल्या भूतकाळातील आठवणी सांगताना राहुल म्हणाला की, जे लोक त्याला अयोग्य वाटायचे, त्यांचा सूड घेण्यासाठी तो अनेकदा हिंसेचा मार्ग अवलंबायचा. आपल्या कुटुंबाचं, विशेषतः आपल्या बहिणीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, असं त्याला वाटायचं. सुरुवातीला जी प्रतिक्रिया योग्य वाटत होती, तीच नंतर त्याच्यासाठी अडचणींचं कारण बनली. यामुळे त्याला अनेकदा पोलीस ठाण्यात जावं लागलं.

बालपणाबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, त्यावेळी त्याची आई किरण दुःखी होती आणि घरात एक प्रकारची नकारात्मकता पसरलेली होती. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवादच होत नव्हता. राहुलनं सांगितलं की, त्याचं वडील महेश भट्ट यांच्यासोबतचं नातं फार काही चांगलं नव्हतं. ‘मी महेश भट्ट यांचा मुलगा नाही’ असंही राहुल म्हणाला. मात्र राहुलनं वडिलांच्या एका पैलूचं कौतुकही केलं. राहुल म्हणाला की, महेश अजूनही त्याची आई किरणच्या आर्थिक गरजांची काळजी घेतात. जेव्हा कधी कुटुंबावर आर्थिक संकट येतं, तेव्हा त्याचे वडील मदतीसाठी नेहमीच हजर असतात.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय