कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं अभिनंदन, राज ठाकरेंचं रजनीकांत यांच्यासाठी खास ट्विट

राज ठाकरे यांनी ट्विट करुन रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं. Raj Thackeray congratulate Rajinikanth

कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं अभिनंदन, राज ठाकरेंचं रजनीकांत यांच्यासाठी खास ट्विट
रजनीकांत राज ठाकरे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत (Rajinikanth )यांचं अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करुन रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी ”कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनंदन” असं म्हटलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा आज सकाळी केली. (Raj Thackeray congratulate Rajinikanth for Dadasaheb Phalake Award)

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “रजनीकांतना काहीच अशक्यन नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे न पाहिलेला पण हिरहिरने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो, असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाही झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी रजनीकांत यांचं दादासाहेब फाळके पुरस्करा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरेंचे ट्विट

प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुरस्काराची घोषणा

2019 वर्षाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (dadasaheb phalke award) जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’

वयाच्या 25व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात!

रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक 1975मध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल’ (Apoorva Raagangal). कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ 15 मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती.

संबंधित बातम्या

Dadasaheb Phalke Award Rajinikanth | ‘थलायवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकर यांची मोठी घोषणा

(Raj Thackeray congratulate Rajinikanth for Dadasaheb Phalake Award)

Published On - 4:58 pm, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI