Dadasaheb Phalke Award Rajinikanth | ‘थलायवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकर यांची मोठी घोषणा

बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Dadasaheb Phalke Award Rajinikanth | ‘थलायवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकर यांची मोठी घोषणा
रजनीकांत
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 2:36 PM

नवी दिल्ली : बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली (dadasaheb phalke award will be conferred upon actor rajinikanth).

यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (dadasaheb phalke award)  जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’

थलायवाचा सन्मान!

(dadasaheb phalke award will be conferred upon actor rajinikanth)

वयाच्या 25व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात!

रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक 1975मध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल’ (Apoorva Raagangal). कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ 15 मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

आधी होते कंडक्टर

चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला. अनेकजण त्यांची पूजा करत असले तरी ते स्वत: मात्र कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.

हिमालय ‘ब्रेक’

प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. 1978 साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे 35 फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.

(dadasaheb phalke award will be conferred upon actor rajinikanth)

हेही वाचा :

‘पुष्पा आय हेट टीयर’ म्हणत राजेश खन्नांनी गाजवला मोठा पडदा, वाचा ‘या’ डायलॉगची मनोरंजक कथा!

Grand Debut | सलमान खानप्रमाणेच ‘या’ स्टारकिडचं होणार ग्रँड लाँचिंग, ‘राजश्री’च्या चित्रपटात झळकणार नवा चेहरा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.