AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘दृश्यम 3’ येताच रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला झटका; तिसऱ्या गुरुवारी कमाईवर परिणाम

Raja Shivaji Box Office Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 21 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु प्रदर्शनाच्या तिसऱ्या गुरुवारी या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळालं.

Raja Shivaji : 'दृश्यम 3' येताच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला झटका; तिसऱ्या गुरुवारी कमाईवर परिणाम
Raja ShivajiImage Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2026 | 8:40 AM
Share

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. विशेषकरून महाराष्ट्रात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. परंतु प्रदर्शनाच्या तिसऱ्या गुरुवारी म्हणजेच 21 व्या दिवशी या चित्रपटाला साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’ने थिएटरमध्ये टक्कर दिली आहे. मोहनलाल यांचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट गुरुवारी 21 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत भरपूर कमाई केली, तर तिसऱ्या आठवड्यात कमाईच्या आकड्यात घट झाल्याचं पहायला मिळालं. सकारात्मक बातमी म्हणजे ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने दुसऱ्याच आठवड्यात आपला 75 कोटी रुपयांचा बजेट वसूल केला आहे आणि आता तो नफा कमावत आहे. इतक्यातच या चित्रपटाला मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’कडून स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे. या चित्रपटाने ‘राजा शिवाजी’च्या तिसऱ्या गुरुवारी होणाऱ्या कमाईला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत कोटींच्या घरात होणारी कमाई आता लाखांमध्ये पोहोचली आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 24.30 कोटी रुपयांची त्यात भर पडली. तिसऱ्या आठवड्यातील पंधराव्या दिवशी 1.45 कोटी रुपये, सोळाव्या दिवशी 2.70 कोटी रुपये, सतराव्या दिवशी 3.45 कोटी रुपये, अठराव्या दिवशी 1.15 कोटी रुपये, एकोणिसाव्या दिवशी 1.30 कोटी रुपये आणि विसाव्या दिवशी 1.10 कोटी रुपये कमावले. ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या 21 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह तिसऱ्या आठवड्यातील कमाईचा एकूण आकडा 11.77 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने भारतात 21 दिवसांत एकूण 89 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास 75 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. याचा अर्थ 14 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत झाला आहे. टक्केवारीनुसार, या चित्रपटाने 18.6 टक्के नफा कमावला आहे.

Follow Us
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही