Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’मध्ये काम केल्यानंतर अभिषेक बच्चनसोबत सिग्नलवर घडली चकीत करणारी घटना; म्हणाला..

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमानंतर अभिषेक बच्चन याचा एक वेगळी ओळख मिळाली आहे. सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु असताना अभिनेत्यासोबत अशी घडना घडली जी, चकित करणारी आहे..

Raja Shivaji : राजा शिवाजीमध्ये काम केल्यानंतर अभिषेक बच्चनसोबत सिग्नलवर घडली चकीत करणारी घटना; म्हणाला..
Abhishek Bachchan
| Updated on: May 13, 2026 | 1:56 PM

Raja Shivaji : अभिनेता अभिषेक बच्चन याने त्याच्या करियरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेका बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमात काम केल्यापासून अभिनेत्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. दरम्यान सिग्नलवर अभिषेक याच्यासोबत अशी काही घटना घडली जी चकीत करणारी आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने यावर मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याची चर्चा सुरु आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वी मी सिग्नलवर उभा होतो… कोणीतरी मला ‘शंभू राजे’ म्हणून हाक मारली… असं माझ्यासोबत पूर्वी कधीच घडलं नाही… यावरून माझ्या लक्षात आलं की, लोकांना मी साकारलेली भूमिका आवडलेली आहे आणि लोकांसाठी हे किती महत्त्वाचं आहे, हे देखील दिसून येत आहे… अशात आमच्यावर जबाबदारी अधिक वाढते आणि पुढे देखील मी माझ्या सर्व भूमिकांना योग्य न्याय देईल…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

सांगायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमात अभिषेक बच्चनने शंभू राजे यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका महाराजांच्या मोठ्या भावाची होती. स्वतःच्या भूमिकेबद्दल अभिनेता म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना एक मोठा भाऊ होता याची मला कल्पनाच नव्हती. त्यांचं नातं खूप घट्ट होतं. सिनेमात त्या काळातील राजकारण, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वे सुंदरपणे चित्रित केली आहेत. जेव्हा मला त्यांच्याबद्दल कळलं, तेव्हा ते मला खूपच आवडलं.’

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

1 मे रोजी ‘राजा शिवाजी’ सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून सिनेमा अद्यापही बॉक्स ऑफिसवर समाधानकारण कमाई करत आहे. सिनेमाच्या 12 व्या दिवसाठी कमाई समोर आली आहे. सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ या सिनेमाने प्रदर्शनाच्या बाराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी 2.50 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणून सिनेमाची आतापर्यंतची कमाई 73.15 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Follow Us