Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, एका आठवड्यात कमावले इतके कोटी, मराठीत सिनेमाने मारली बाजी

Raja Shivaji : 1 मे रोजी प्रदर्शित झालेला 'राजा शिवाजी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसात मिळत आहे. एका आठवड्यात सिनेमाने किती कोटींचा गल्ला जमवला आहे.

Raja Shivaji : राजा शिवाजीचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, एका आठवड्यात कमावले इतके कोटी, मराठीत सिनेमाने मारली बाजी
| Updated on: May 08, 2026 | 8:33 AM

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील इतिहास रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित सिनेमात खुद्द रितेश याने महाराजांची भूमिका साकारली आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात 50 कोटी रुपयांचा प्रभावी टप्पा ओलांडला आहे. थरारक अॅक्शन आणि ऐतिहासिक कथानकाने परिपूर्ण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

बॉलिवूड स्टार रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमाने चित्रपटगृहांवर वर्चस्व गाजवलं आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचत आहे. १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या एका आठवड्यातच 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या ऐतिहासिक सिनेमाने भारतात आतापर्यंत किती कोटींची कमाई केली आहे, ते जाणून घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख याने केलं असून, हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालाय. पण मराठी भाषेतील सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्क रिपोर्टच्या मते, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने बॉक्स ऑफिस आपली पकड मजबूत केली आहे. सिनेमाने गुरुवारी म्हणजे सातव्या दिवशी 4 कोटींचा गल्ला जमा केला. म्हणजे सिनेमाने 52.65 कोटींची कमाई केली आहे.

सिनेमाच्या सुरुवातीच्या कमाईबद्दल सांगायचं झाल्यास, गेल्या शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 11.35 कोटींची दमदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी 10.55 कोटी आणि रविवारी 12 कोटींची कमाई केली. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, वर्किंग डेज असल्यामुळे सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावलेला दिसत आहे. सोमवारी सिनेमाने 5.60 कोटींची कमाई केली. मंगळवार आणि बुधवारी हे आकडे 4.90 कोटी आणि 4.25 कोटी असे होते. गुरुवारी सिनेमाची कमी कमाई झाली. तरी देखील पहिल्या आठवड्यात सिनेमाने 50 कोटींचा गल्ला पार केला आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारखे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमात सलमान खानने पाहुण्या कालाकाराची भूमिका बजावली आहे.

Follow Us