AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?

India Women Semi Final Scenario: हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाला रविवारी 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरीसाठी किती संधी आहे. जाणून घ्या.

Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?
Smriti Mandhana and Harmanpreet Kaur Team India T20i World Cup 2026Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 22, 2026 | 6:37 PM
Share

भारतीय महिला संघ झकास सुरुवातीनंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने रविवारी 21 जून रोजी भारताचा विजयरथ रोखून एकूण दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत करुन सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र तसं झालं नाही. भारताला हा सामना जिंकून उपांत्य फेरीची वाट जवळपास मोकळी करण्याची संधी होती. मात्र आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला उपांत्य फेरीची किती संधी आहे? हे जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिकेने मँचेस्टरमध्ये आयोजित सामन्यात भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. या पराभवानंतरही भारताला उपांत्य फेरीची संधी कायम आहे. मात्र काही प्रमाणात चिंता वाढली आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलियाही आहे. त्यामुळे भारताला स्वत:च्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये 3 सामन्यांतील 2 विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेनेही भारताप्रमाणे 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र भारतापेक्षा नेट रनरेट कमी असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. मात्र तसं असलं तरी दक्षिण आफ्रिकेसाठी आगामी 2 सामने तुलनेत सोपे आहेत. दक्षिण आफ्रिका आगामी 2 सामन्यांत नेदरलँड्स आणि बांगलादेश विरुद्ध 2 हात करणार आहे. तर टीम इंडियाला बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित 2 क्रिकेट सामन्यांत खेळायचं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असणं भारतासाठी जमेची बाब आहे.

भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण

आता भारताला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच भारत 2 पैकी एका सामन्यात पराभूत झाल्यास दक्षिण आफ्रिकेने किमान 1 सामना गमवावा तर महिला ब्रिगेडला नेट रनरेटमध्ये आणखी फायदा होईल.

नेट रनरेट महत्त्वाचा का?

नेट रनरेटचा अपवाद वगळल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. आता या दोन्ही संघांनी उर्वरित 2 सामने जिंकले तर त्यांचे प्रत्येकी 8-8 गुण होतील. तसेच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केल्यास त्यांचेही 8 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेटच्या आधारे उपांत्य फेरीतील 2 संघ निश्चित होतील. त्यामुळे उर्वरित सामन्यांत नेट रनरेट हा महत्त्वाचा ठरणार आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...