AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडखोर खासदारांवरील बडतर्फची कारवाई टळली? एकनाथ शिंदेंच्या त्या खेळीने उद्धव ठाकरेंना मोठा झटका

मोठी बातमी समोर आली आहे, अखेर शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बंडखोर खासदारांवरील बडतर्फची कारवाई टळली? एकनाथ शिंदेंच्या त्या खेळीने उद्धव ठाकरेंना मोठा झटका
Eknath Shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 6:13 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर शिवसेना ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदारांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाईल, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु एकनाथ शिंदे यांनी या खासदारांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच मोठी खेळी केली आहे. त्यामुळे आता या सर्व खासदारांची  खासदारकी सुरक्षीत झाली आहे. त्यामुळे या बाजुने देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, संसदीय चौकटीत ही प्रक्रिया आम्ही  केलेली आहे. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आधीच झाली आहे. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आधीच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असल्यामुळे आता या बंडखोर खासदारांवर संसदीय कारवायची शक्यता देखील मावळली आहे.

40 आमदार होते. आम्ही 60 आमदार निवडून आणले. चांदा ते बांद्यापर्यंत शिवसेना वाढवली. विचारधारा महत्त्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली महाराष्ट्राने नाकारलं. महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं आहे. पुरोगामी राज्य आहे. आपली संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. लोकांच्या मनात जे आहे ते देण्याचं काम आम्ही केलं आहे. प्रचंड प्रमाणात लोक शिवसेनेत येत आहेत. विचारधारेशी जोडले जात आहे. आपला अजेंडा विकास आहे.

सहा खासदार सोबत आले आहेत. लाखो लोकांनी मतदान केल्याने ते निवडून आले आहेत. त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि जनता आणि सहा लोकांची ताकद आता वाढली आहे. त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं, प्रश्न आणि प्रकल्प प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. मी दिलेला शब्द पाळतो हे माहीत आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...