AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारकी गेल्यावर गरीबी आली का? ‘पंचायत’मधील अभिनेत्याचा रस्त्यावर भाजी खरेदी करतानाचा फोटो व्हायरल

'पंचायत'मधील आमदारजी रस्त्यावर भाजी विकत घेतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल. फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

आमदारकी गेल्यावर गरीबी आली का? 'पंचायत'मधील अभिनेत्याचा रस्त्यावर भाजी खरेदी करतानाचा फोटो व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 22, 2026 | 6:24 PM
Share

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’ च्या चारही सीझनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी आमदार चंद्रकिशोर सिंह यांची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज झा सध्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आले आहेत.

पंकज झा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला खरेदी करताना दिसत आहेत. त्यांच्या समोर टोमॅटो, काकडी, दुधी भोपळा यांसारख्या विविध भाज्या ठेवलेल्या आहेत आणि ते त्यातून भाजी निवडताना दिसतात. विशेष म्हणजे, या फोटोसोबत त्यांनी कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. त्यामुळे हा फोटो नेमका कधीचा आहे किंवा कोणत्या प्रसंगी काढण्यात आला आहे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

‘पंचायत’मधील आमदारजींची लोकप्रियता

पंकज झा यांच्या या फोटोवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अनेक विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, आमदारजी, लौकी घ्या बरं! तर दुसऱ्याने मजेशीर अंदाजात आमदारकी गेल्यानंतर गरीबी आली वाटतं अशी टिप्पणी केली. आणखी एका युजरने आमदारजींची ही काय अवस्था झाली? असे लिहिले, तर एका चाहत्याने आमदारजींना तर कोंबडीच जास्त आवडते अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली.

लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’मध्ये पंकज झा यांनी आमदार चंद्रकिशोर सिंह यांची भूमिका साकारली आहे. मालिकेत त्यांनी नकारात्मक छटा असलेले पात्र रंगवले असले, तरी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या संवाद आणि प्रभावी स्क्रीन उपस्थितीमुळे ते मालिकेतील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक बनले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pankaj Jha (@realpankajjha)

‘पंचायत 5’ची उत्सुकता शिगेला

दरम्यान, ‘पंचायत’चे आतापर्यंत चार सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेच्या पुढील भागाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी पाचवा सीझन यावर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट;
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट