AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश खन्ना यांची शेवटची इच्छा अखेर अपूर्ण, मृत्यूनंतर बेडरुममध्ये सापडल्या 64 सुटकेस, उघडताच सगळ्यांनाच धक्का

राजेश खन्ना हे 60 आणि 70 च्या दशकातले सुपरस्टार होते. हा अभिनेता त्याच्या उदारतेसाठी देखील प्रसिद्ध होता. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या बेडरुममध्ये तब्बल 64 सुटकेस सापडल्या होत्या. जेव्हा त्या उघडल्या गेल्या तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. 

राजेश खन्ना यांची शेवटची इच्छा अखेर अपूर्ण, मृत्यूनंतर बेडरुममध्ये सापडल्या 64 सुटकेस, उघडताच सगळ्यांनाच धक्का
Rajesh Khanna Unfulfilled Wish, 64 Suitcases Found After DeathImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2025 | 6:40 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांचे चित्रपट नेहमीच चर्चेत राहिले आहेत. 60 आणि 70 च्या दशकात राजेश खन्ना यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. या काळात या अभिनेत्याने एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले आणि त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हटले गेलं. राजेश खन्ना हे एकमेव स्टार होते जे लक्झरी कारमधून चित्रपटांच्या ऑडिशनला जायचे. त्याच वेळी, स्टार झाल्यानंतर, मुली त्याच्यांसाठी इतक्या वेड्या झाल्या की त्या त्यांच्या कारला किस करायच्या.  हा अभिनेता त्याच्या उदारतेसाठी देखील प्रसिद्ध होता आणि ते त्याच्या प्रियजनांसाठी भरपूर भेटवस्तू आणत असंत. आजारपणामुळे 2012 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर, त्याच्या घरातून तब्बल 64 सुटकेस सापडल्या, ज्या ते हयात असताना कधीही उघडल्या गेल्या नव्हत्या.

या 64 सुटकेस उघडल्या आणि सर्वजण हैराण 

राजेश खन्ना जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जायचेतेव्हा ते त्यांच्या मित्रांसाठी अमूल्य भेटवस्तूंनी भरलेल्या चक्क सुटकेसच आणायचे. या सर्व भेटवस्तू त्याच्या मित्रांमध्ये वाटल्यानंतर ते कोणाला काय दिलं हे विसरायचे. त्याचपद्धतीने जेव्हा राजेश खन्ना यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या आशीर्वाद याबंगल्यामध्ये त्यांच्या 64 सुटकेस सापडल्या. ज्या नंतर उघडण्यात आल्या. आणि जेव्हा त्या सुटकेस उघडल्या तेव्हा त्यात जे होतं ते पाहून सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. कारण या सर्व सुटकेसमध्ये फार महागड्या भेटवस्तू होत्या ज्या राजेश खन्ना यांना त्यांच्या चाहत्यांना द्यायच्या होत्या. परंतु त्यांच्या निधनामुळे या सर्व भेटवस्तू त्यांच्या सुटकेसमध्येच राहिल्या.आणि त्यांची ती शेवटची इच्छाही अपूर्णच राहिली.  लेखक गौतम चिंतामणी यांनी राजेश खन्ना यांची बायोग्राफी  ‘डार्क स्टार: द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकात उघड केलं आहे.

अभिनेत्याचे हिट चित्रपट

लेखकाने त्याच्या पुस्तकात सांगितले आहे की राजेश खन्ना यांना एकटे राहणे खूप आवडायचे, परंतु ते लोकांना खूप प्रेम करत असे. म्हणूनच ते कधीही त्यांच्या प्रियजनांना निराश करत नव्हते.18  जुलै 2012 रोजी मुंबईत राजेश खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ‘आखरी खत’ (1966) या चित्रपटातून पदार्पण केलं. कटी पतंग, आं मिलो सजना, सच्चा झूठा, हाथी मेरे साथी, आराधना, दो रास्ते, आनंद, नमक हराम, बावर्ची असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.