Rajinikanth | थेट ‘या’ देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीला रजनीकांत, फोटो व्हायरल, अत्यंत मोठी माहिती पुढे

रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जेलर या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहेत. रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. रजनीकांत हे जेलर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले.

Rajinikanth | थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीला रजनीकांत, फोटो व्हायरल, अत्यंत मोठी माहिती पुढे
| Updated on: Sep 11, 2023 | 9:03 PM

मुंबई : रजनीकांत हे सध्या त्यांच्या जेलर या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रजनीकांत (Rajinikanth) यांचा हा चित्रपट रिलीज झालाय. नेहमीप्रमाणेच रजनीकांत यांचा हा देखील चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. रजनीकांत याच्या जेलर (Jailer) चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे तोडले आहेत. धमाकेदार अॅक्शन करताना रजनीकांत हे जेलर चित्रपटामध्ये दिसले. रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. विशेष म्हणजे जेलर चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळाली.

रजनीकांत हे जेलर चित्रपटाचे धमाकेदार पद्धतीने प्रमोशन करताना दिसले. जेलर हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झालाय. जेलर हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर रजनीकांत हे बद्रीनाथ मंदिरात नतमस्तक होताना दिसले. यावेळीची अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या भेटीलाही रजनीकांत गेले. एकीकडे रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट धमाका करता असतानाच रजनीकांत यांचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रजनीकांत यांचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. रजनीकांत यांच्या या फोटोमध्ये थेट मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे दिसत आहेत.

नुकताच मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि रजनीकांत यांची भेट झालीये. विशेष बाब म्हणजे दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे. यावेळी एकमेकांची गळाभेट घेताना देखील अनवर इब्राहिम आणि रजनीकांत हे दिसले आहेत. हे फोटो मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी हे फोटो शेअर करत लिहिले की, आज मी भारतीय चित्रपट स्टार रजनीकांत यांना भेटलो. जे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रात एक प्रसिद्ध असे नाव आहे. लोकांच्या दु:खाच्या आणि वेदनांच्या मुद्द्यावर त्यांनी माझ्या संघर्षाला जो आदर दिला त्याबद्दल मला विशेष कौतुक नक्कीच वाटले आहे.

पुढे मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी लिहिले की, अनौपचारिकपणे ज्या गोष्टींवर चर्चा झाली त्या निश्चितपणे समाजघटकांशी संबंधित होत्या. रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत चमकदार कामगिरी करत राहो हीच प्रार्थना…आता ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये रजनीकांत आणि अनवर इब्राहिम हे दोघेही खूप जास्त आनंदी दिसत आहेत.