AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Annaatthe | ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या सेटवर आठजण कोरोना पॉझिटिव्ह, रजनीकांत क्वारंटाइन होणार! 

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते.

Annaatthe | 'अन्नाथे' चित्रपटाच्या सेटवर आठजण कोरोना पॉझिटिव्ह, रजनीकांत क्वारंटाइन होणार! 
| Updated on: Dec 23, 2020 | 6:21 PM
Share

मुंबई : कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत (Rajinikanth) हे सध्या अन्नाथे (Annaatthe) या चित्रपटाचे शूटिंग करत होते. जिथे आता चित्रपटाच्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. (Eight corona positive, Rajinikanth to be quarantined on set of Annaatthe)

ज्यामुळे आता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. ज्यानंतर सेटवर कोरोना पॉझिटिव्ह रूग्न सापडल्यानंतर शूटिंग थांबविण्यात आले आहे.या विषयावर बोलताना

रजनीकांतचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी इंडिया टुडेसोबत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रवक्त्याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. याच कारणास्तव, रजनी सर हैदराबादमध्ये स्वत: ला क्वारंटाइन करतील किंवा चेन्नईला परत येईल.

शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही त्यांच्यासोबत हैदराबादला आली होता. प्रोडक्शन हाऊसने ऐश्वर्या आणि वडील रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता.

नव्या वर्षाची दमदार सुरुवात…

पुढच्या वर्षी, अर्थात 2021मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रजनीकांत आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रजनीकांत यांनी महत्त्वाच्या बैठकीसंदर्भात आपले निवेदन जारी केले होते. यात म्हटले होते की, ‘ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.’

राजकारणात सक्रिय

गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. मात्र, त्यांचे सहकलाकार कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते, असे मानले जात आहे

संबंधित बातम्या : 

रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!

दीपिकाचा ‘छपाक’, रजनीकांतचा ‘दरबार’ की अजय देवगणचा ‘तान्हाजी’, कोण मारणार बाजी?

(Eight corona positive, Rajinikanth to be quarantined on set of Annaatthe)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.