AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; हृदयविकाराच्या झटक्यानंतर एम्स रुग्णालयात उपचार सुरू

डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; हृदयविकाराच्या झटक्यानंतर एम्स रुग्णालयात उपचार सुरू
Raju SrivastavaImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 11:04 AM
Share

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. व्हेंटिलेटरवर असलेल्या राजू यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. बुधवारी (10 ऑगस्ट)दिल्लीतीलच एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. या वेदनांमुळे ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं.

राजू श्रीवास्तव कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल

मिळालेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव हे एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल आहेत, जिथे डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राजू यांची अँजिओग्राफी केली असता त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज आढळले आहेत. राजू श्रीवास्तव यांचे भाऊ आशिष श्रीवास्तव म्हणाले, “राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये जात असताना हृदयविकाराचा झटका आला. ते राज्यातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते. ते सकाळी जिममध्ये गेले आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.”

राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांना कॉमेडियन व्हायचं होतं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. मात्र, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल