Raju Srivastava: कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

राजू श्रीवास्तवच्या भावाने या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती दिली. आज सकाळी (10 ऑगस्ट) वर्कआऊट  करत असताना राजू अचानक ट्रेडमिलवर पडला.

Raju Srivastava: कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल
Raju Srivastava
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 10, 2022 | 2:09 PM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे जिममध्ये वर्कआऊट (Workout) करत असताना अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांच्या भावाने या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती दिली. आज सकाळी (10 ऑगस्ट) वर्कआऊट  करत असताना राजू अचानक ट्रेडमिलवर पडले. यानंतर त्यांना तातडीने दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सध्या रुग्णालयाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. राजू श्रीवास्तव हे भाजप नेते आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षसुद्धा आहेत. नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ते प्रमुख भूमिका बजावत आहेत.

राजू यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूरमध्ये झाला. त्यांचं खरे नाव सत्य प्रकाश असं आहे. पण आज संपूर्ण जगात ते राजू श्रीवास्तव या नावानेच ओळखले जातात. राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांना कॉमेडियन व्हायचं होतं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. मात्र, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं. या शोमध्ये ‘गजोधर भैय्या’ हे रनरअप ठरले असले, तरी प्रेक्षकांनी त्यांना ‘द किंग ऑफ कॉमेडी’ ही पदवी दिली होती.

उदरनिर्वाहासाठी रिक्षाही चालवली!

विनोदी कलाकार होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या राजू यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईसारख्या शहरात घरून पाठवलेला पैसा कमी पडायचा. अशा परिस्थितीत स्वतःचा खर्च उचलण्यासाठी राजू यांनी ऑटोही चालवली. या दरम्यान त्यांनी कधी-कधी शोचे ऑफरही यायचे. राजू यांना एका प्रवाशाच्या ओळखीने मोठा ब्रेक मिळाला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. राजू बिग बॉसचाही भाग बनले होते. ते शो जिंकू शकले नाही पण त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. याशिवाय राजू यांनी राजकारणातही प्रवेश केला. राजू यांनी समाजवादी पक्ष सोडल्यानंतर भाजपची निवड केली. मात्र, त्यांच्यातील विनोदवीर कधीच संपला नाही आणि ते राजकारणाच्या रंगातही रंगू शकले नाहीत.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें