
कधीकधी अभिनेत्री प्रसिद्धीसाठी काय करतील याचा नेमक नसतो. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री चक्क टॉवेलवर कॅमेरासमोर आली आहे. तिने त्या टॉवेलवर डान्स देखील केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
कोण आहे ती अभिनेत्री?
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आहे. राखी बराच काळ लोकांच्या नजरेपासून दूर होती आणि सोशल मीडियावरही विशेष सक्रिय दिसली नाही. इतकंच नव्हे, तर ती भारत सोडून दुबईला स्थायिक झाली होती. पण आता ती परत भारतात आली आहे आणि तिचा आनंद साजरा करताना दिसत आहे. राखी सावंतने आपल्या परतण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्याने खळबळ माजली आहे.
राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने फक्त टॉवेल गुंडाळला आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, ‘अखेर तुमची राखी सावंत भारतात येत आहे. तर मित्रांनो, मी वाट पाहत आहे आणि तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी आतुर आहे.’ यानंतर त्या ‘उप्स, उप्स..’ म्हणत टॉवेल काढते आणि शरीर पुन्हा झाकण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओच्या शेवटी तू टॉवेल बाजूला करुन मोनोकिनीमधील अवतार दाखवते.
राखी सावंतची नौटंकी पाहून युजर्स म्हणाले..
स्लिम-ट्रिम राखी सावंत काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये आपल्या अदा दाखवत आहेत. राखी सावंत ज्या पद्धतीने हे करतात, ते पाहून लोक हसू लागले. तिच्या व्हिडीओवर खूप कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिले आहे, ‘तुम्ही येऊ नका प्लीज.’ दुसऱ्याचा कमेंट करत म्हटले आहे, ‘आता बिग बॉस मध्ये या राखी, आम्ही सगळे तुमची वाट पाहत आहोत.’ तर काहींनी राखीचे कृत्य आवडले नाही.