AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | राखी सावंत हिचा ‘तो’ डान्स व्हिडीओ व्हायरल होताच लोकांचा संताप, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म देखील स्वीकारला असून लग्नानंतर फातिमा असे राखीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने आदिल दुर्रानीवर गंभीर आरोप केले.

Rakhi Sawant | राखी सावंत हिचा 'तो' डान्स व्हिडीओ व्हायरल होताच लोकांचा संताप, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल
| Updated on: May 19, 2023 | 4:13 PM
Share

मुंबई : राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सर्वांना मोठा धक्का देत तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे राखी सावंत हिने हे फोटो शेअर करण्याच्या अगोदर तब्बल सात महिन्यांपूर्वीच तिचे लग्न हे आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत झाले. मात्र, आदिल दुर्रानी यानेच आपल्याला लग्नाची गोष्ट ही सर्वांपासून लपवून ठेवण्यास सांगितल्याचे राखी हिने म्हटले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न (Marriage) केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला. आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नानंतर राखी सावंत हिने तिचे नाव फातिमा असल्याचे सांगितले.

काही दिवस राखी सावंत हिचा संसार सुखी सुरू होता. मात्र, अचानक आदिल दुर्रानी याच्यावर राखी हिने काही गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. यांचे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले आहे. राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. राखी हिने आदिल दुर्रानीवर अनेक आरोप केले आहेत.

नुकताच राखी सावंत हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत ही या व्हिडीओमध्ये डान्स क्लबमध्ये गेल्याचे दिसत आहे. अत्यंत बोल्ड लूकमध्ये राखी सावंत दिसत असून धमाकेदार डान्स करताना राखी सावंत ही दिसतंय. राखी सावंत हिचा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.

राखी सावंत हिच्या भोवती बरेच लोक दिसत असून दुनिया दिवानी है या गाण्यावर डान्स करताना राखी सावंत ही दिसत आहे. राखी सावंत हिने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास देखील सुरूवात केली आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, बघा आता ही फातिमा. दुसऱ्याने लिहिले की, ही फक्त नाटक चांगल्या प्रकारे करते.

तिसऱ्याने लिहिले की, फातिमा कुठे गेली, तू मुस्लिम नाहीस…एकीकडे राखी सावंत हिला या व्हिडीओमुळे ट्रोल केले जात आहे तर दुसरीकडे राखी सावंत हिला असे बिनधास्त पाहून तिचे चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. आदिल दुर्रानी याने आपल्याला धोका दिल्याचे देखील राखी सावंत हिने अनेकदा म्हटले आहे. आपल्याशी लग्न केल्यानंतरही आदिल दुर्रानी याचे तनू नावाच्या मुलीसोबत अफेअर सुरू असल्याचे राखी हिने म्हटल होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?