Ram Gopal Varma: ‘मेलेल्या लोकांबद्दल मी कोणता विचारच…’, श्रीदेवी यांच्याबद्दल असं काय बोलून गेले राम गोपाल वर्मा?
Ram Gopal Varma On Sridevi: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नुकताच श्रीदेवी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं असून, त्यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मृत्यूमुखी पावलेल्या लोकांबद्दल त्यांचे काय विचार आहेत, सांगत राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या मृत्यूबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

Ram Gopal Varma On Sridevi : दिग्गज दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मृत्यूनंतर देखील त्यांचे अनेक सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. त्यांची गाणी देखील चाहत्यांमध्ये आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. पण नुकताच बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असं वक्तव्य केलं. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, श्रीदेवी यांच्याल जिवनावर आधारित ‘द एम्प्रेस’ नावाचं पुस्तक लिहिलं जात आहे. त्यामध्ये एक चॅप्टर राम गोपल वर्मा देखील लिहिणार आहे. पण त्याआधी त्यांनी असं वक्तव्य केलं, जे चर्चेत आलं आहे.
राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आलं की, श्रीदेवी यांच्या बर्थ एनिव्हर्सरीला त्यांच्या आठवणीत कोणता सिनेमा पाहिला? यावर नकार देत, राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘मी मेलेल्या लोकांबद्दल बिलकूल विचार करत नाही. जेव्हा ते जातात, तेव्हा ते माझ्या आयुष्यातून देखील निघून जातात. मी मेलेल्या लोकांबद्दल विचार करण्यापेक्षा माझ्या आयुष्यावर अधिक लक्ष देईल… मी सध्या अभिनेते हर्षवर्धन राणे याच्यासोबत ‘पुलिस कंपनी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे…’
श्रीदेवी यांच्या कामाचं केलं कौतुक…
राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांचं कौतुक देखील केलं. ‘श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. त्यांनी स्क्रिनवर जे काम केलं, ते मला आजही समजलेलं नाही. जसं की, ”मिस्टर इंडिया’ सिनेमातील चार्ली चॅपलिनची भूमिका… अशा गोष्टींमागची कला समजणं फर कठीण आहे… मी जेवढ्या कलाकारांनी डायरेक्ट केलं आहे. त्यामध्ये श्रीदेवी सर्वात दमदार होत्या..’ असं देखील राम गोपाल वर्मा म्हणाले.
श्रीदेवी यांची बायोग्राफी ‘द एम्प्रेस’
श्रीदेवी यांची बायोग्राफी ‘द एम्प्रेस’चं लेखण धिरज यू कुमार लिहित आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने त्यांच्या बर्थ एनिव्हर्सरीला पुस्तकाचा पोस्टर प्रदर्शित केलेला. त्यानंतर, राम गोपाल वर्मा यांनी जाहिर केलं की तेदेखील या पुस्तकासाठी एक प्रकरण (chapter) लिहतील. मात्र, या पुस्तकाचे शीर्षक ‘द एम्प्रेस’ आहे, याची आपल्याला कल्पना नव्हती, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
