Ramayana Box Office Day 16 : ‘पुष्पा 2’ ला टाकलं मागे! आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ने पार केला 875 कोटींचा टप्पा, रचला मोठा इतिहास

Ramayana Box Office Day 16 : अभिनेता रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम रचताना दिसत आहे. आता सिनेमाच्या 16 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा देखील समोर आला आहे.

Ramayana Box Office Day 16 : पुष्पा 2 ला टाकलं मागे! आदिनाथ कोठारेच्या रामायणने पार केला 875 कोटींचा टप्पा, रचला मोठा इतिहास
Ramayana
| Updated on: Nov 21, 2026 | 7:04 AM

Ramayana Box Office Day 16 : अभिनेता रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. पहिल्या काही दिवसांतच सिनेमाने 100 कोटी रुपयांचा आकडा क्रॉस केला. ‘रामायण’ सिनेमा फक्त भरतातच नाही तर, जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर देखील राज्य करत आहे. याच कारणामुळे सलग सोळा दिवस सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजल मारताना दिसत आहे. आता सिनेमाच्या 16 व्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे. 16 व्या दिवशी सिनेमाची कमाई मंदावली असल्याचं चित्र दिसून आलं. पण आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘रामायण’ सिनेमाची 16 व्या दिवसाची कमाई

Loading...

सॅकनिल्कच्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, ‘रामायण’ (Ramayana)सिनेमाने शुक्रवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या 16 व्या दिवशी 13.27 कोटींची कमाई केली असून, यासह सिनेमाचं भारतातील नेट कलेक्शन 877.02 कोटी रुपये झालं आहे. सांगायचं झालं तर, गुरुवारी ‘रामायण’ सिनेमाने 19.35 कोटी रुपयांची कमाई केली होती, मात्र शुक्रवारी कमाईत घट झाली. आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रपयांपर्यंत कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 64.85 कोटींची ओपनिंग घेतली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सिनेमाच्या कमाईत अभूतपूर्व वाढ दिसून आली आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी सिनेमाने थेट 107.50 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटगृहांतील पहिल्या आठ दिवसांनंतर ‘रामायण’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 564.60 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत होती.

9 ते 15 व्या दिवसादरम्यान सिनेमाने 299.15 कोटी रुपयांची कमाई केली. ‘रामायण’ने हिंदी बॉक्स ऑफिसवरही एक मोठा टप्पा गाठला आहे. या सिनेमाने अवघ्या 15 दिवसांत हिंदीमध्ये 650 कोटींचा नेट कमाईचा आकडा पार केला आहे, तर हा टप्पा गाठणारा ‘रामायण’ दुसरा सिनेमा ठरला आह . या बाबतीत सिनेमाने फक्त ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2: The Revenge) च्या मागे आहे, ज्याने हा टप्पा अवघ्या नऊ दिवसांत गाठला होता.

तर ‘रामायण’ सिनेमाने ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) ला मागे टाकलं आहे, ज्याला हिंदीमध्ये 650 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी 17 दिवस लागले होते, तर ‘धुरंधर’ने हा विक्रम 23 दिवसांत केला होता. अशा प्रकारे ‘रामायण’ने सर्वात वेगाने हा टप्पा गाठणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us