Ramayana Box Office Collection Day 2: आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ सिनेमाचा सर्वत्र जलवा, दुसऱ्या दिवशी ओलांडला इतक्या कोटींचा टप्पा
Ramayana Box Office Collection Day 2: अभिनेता आदिनाथ कोठारे याची महत्त्वाची भूमिका असलेला 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सिनेमाने दुसऱ्या दिवशी देखील मोठी कमाई केली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'रामायण' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Ramayana Box Office Collection Day 2: अभिनेता रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमाचा पहिला भाग सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. फक्त दोन दिवसांमध्ये 100 कोटींचा आकडा ओलांडलेल्या ‘रामायण’ सिनेमाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे. सांगायचं झालं तर, सिनेमाने पहिल्याच दिवशी 64.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत सिनेमाने 48.05 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे पहिल्या दोन दिवसांतच सिनेमा 112.90 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे… ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
2 दिवसांत सिनेमाने ओलांडला 112 कोटी रुपयांची कमाई… शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत सिनेमाने 48.05 कोटी रुपयांची कमाई केली. तर गुरुवारी म्हणजे पहिल्याच दिवशी सिनेमा 64.85 कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाई कमी झाली. पण सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. आता सिनेमा पुढे किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
‘ॲनिमल’ सिनेमाला टाकलं मागे, अनेक मोठ्या सिनेमाचे मोडले रेकॉर्ड…
‘रामायण’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 64.85 कोटी रुपयांची कमाई केली. तर रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 63 कोटी रुपयांची कमाई केलेली. तर शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 75 कोटींचा गल्ला जमवलेला. अभिनेका रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर 2’ सिनेमाने तर पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करत बाजी मारली. या सिनेमाच्या तुलनेत ‘रामायण’ सिनेमा पिछाडीवर आहे.
‘रामायण’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, नमित मल्होत्रा निर्मित आणि यश याने सिनेमा ग्लोबल लेवलवर प्रदर्शित केलं आहे. जगभरातील 100 देशातील जवळपास 50 हजारपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दोन भागांत तयार होत असलेल्या या रामायण सीरिजचं एकूण बजेट जवळपास 4000 कोटी रुपये आहे. व्हीएफएक्स (VFX) आणि सिनेमॅटिक भव्यतेच्या बाबतीत ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी मालिका मानली जात आहे. याचा पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज झाला असून, ‘रामायण: पार्ट 2’ सन 2028मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.