AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानपेक्षाही श्रीमंत, गॅरेजपासून सुरू झाला 16000 कोटींचा प्रवास; त्याच्या चित्रपटाची जगभरात चर्चा

एका गॅराजमधील छोट्या व्हिडीओ वर्कशॉपपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ग्लोबल व्हिज्युअल इफेक्ट्स इंडस्ट्री आणि भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एका प्रोजेक्टपर्यंत पोहोचला आहे.

शाहरुख खानपेक्षाही श्रीमंत, गॅरेजपासून सुरू झाला 16000 कोटींचा प्रवास; त्याच्या चित्रपटाची जगभरात चर्चा
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2026 | 10:59 AM
Share

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026 मुळे एका अशा व्यक्तीची चर्चा सुरू झाली आहे, ज्याची कौटुंबिक संपत्ती शाहरुख खानच्या संपत्तीपेक्षाही अधिक असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती म्हणजे रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाचे निर्माता नमित मल्होत्रा. हुरुनच्या आकडेवारीनुसार, मल्होत्रा कुटुंबाची संपत्ती तब्बल 16,000 कोटी रुपये आहे.

शाहरुखची संपत्ती किती?

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026 नुसार, शाहरुख खानची संपत्ती सुमारे 10,000 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी हा आकडा 12,490 कोटी रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. शाहरुखची संपत्ती केवळ चित्रपटांमधून मिळणाऱ्या कमाईवर आधारित नाही. रेड चिलीज एंटरटेनमेंट, नाइट रायडर्स स्पोर्ट्स, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि विविध गुंतवणुकी त्याच्या संपत्तीचा भाग आहेत. मात्र, नमित मल्होत्रा यांच्या बाबतीत समोर आलेला 16,000 कोटी रुपयांचा आकडा त्यांची वैयक्तिक नेटवर्थ नसून मल्होत्रा कुटुंबाची एकत्रित संपत्ती आहे. या कुटुंबाने हुरुनच्या यादीत 232वं स्थान मिळवलं असून त्यांच्या संपत्तीत एका वर्षात 279 टक्क्यांची वाढ झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे.

गॅराजमध्ये सुरू केली कंपनी

नमित मल्होत्रा यांचा प्रवासही विशेष आहे. फिल्मी कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी पारंपरिक पद्धतीने अभिनय किंवा दिग्दर्शन क्षेत्र निवडलं नाही. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी वडील नरेश मल्होत्रा यांच्या गॅराजमध्ये छोट्या व्हिडीओ वर्कशॉपपासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपली कंपनी वडिलांच्या ‘व्हिडीओ वर्क्स’ या प्रॉडक्शन बिझनेसमध्ये विलीन केली. या नव्या कंपनीला ‘प्राइम फोकस’ नाव देण्यात आलं. पुढे प्राइम फोकसने लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि व्हँकुव्हरपर्यंत आपला व्यवसाय विस्तारला.

आता ‘रामायण’ची मोठी जबाबदारी

नमित मल्होत्रा सध्या रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आहेत. या प्रोजेक्टचा एकूण बजेट सुमारे 4,000 कोटी रुपये असल्याचं नमित यांनी यापूर्वी सांगितलं आहे. चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून पहिला भाग यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची योजना आहे.

Follow Us
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...