Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा भितीदायक अंदाज; ‘ॲनिमल’चा फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क!

नव्या वर्षात रणबीर कपूरच्या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित; फोटो पाहून चाहते म्हणाले 'खतरनाक'!

Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा भितीदायक अंदाज; 'ॲनिमल'चा फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क!
Ranbir KapoorImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 10:04 AM

मुंबई: शनिवारी संध्याकाळी सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. रणबीरच्या बहुप्रतिक्षित ‘ॲनिमल’ या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये रणबीरचा वेगळाच अंदाज पहायला मिळतोय. रणबीरचा भितीदायक लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ॲनिमलमध्ये रणबीरचा अनोखा अंदाज

ॲनिमलच्या पोस्टरमध्ये रणबीरचा साइड-लूक पहायला मिळतोय. मोठी दाढी, वाढलेले केस, काखेत कुऱ्हाड आणि शरीरावर अनेक जखमा अशा अवस्थेत तो कोणाकडे तरी रागाने पाहत असल्याचं यात दिसतंय. रणबीरचा हा लूक पाहून चाहते त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

काही युजर्सनी रणबीरच्या या लूकला ‘भितीदायक’ असल्याचं म्हटलंय तर काहींनी हा लूक पुष्पा आणि कबीर सिंग यांचं मिश्रण करून बनवलेला दिसत असल्याचं म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by T-Series (@tseries.official)

रणबीरचा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलंय. संदीपचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. ॲनिमल या चित्रपटात रणबीरसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि रश्मिका मंदाना यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटात रणबीर अत्यंत वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. रश्मिकाने गेल्या वर्षी ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्यामुळे आता ‘ॲनिमल’ या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.