Ramayan: पहिल्यांदाच असं घडलं, रामाने धरले हनुमानाचे पाय; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘संस्कार असावे तर असे..’

रामायण चित्रपटाचा ट्रेलर 24 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे, आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी आता एक इव्हेंट झाला आहे. ज्यात रामायण चित्रपटांतील सर्व कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Ramayan: पहिल्यांदाच असं घडलं, रामाने धरले हनुमानाचे पाय; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले संस्कार असावे तर असे..
ramayan movie
| Updated on: Jul 19, 2026 | 10:27 AM

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित कधी होणार हे समजल आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम दिल्लीत दाखल झाली, जिथे रणबीर कपूरने साई पल्लवीसोबत शानदार एन्ट्री केली. त्यांच्या पाठोपाठ यश, रवी दुबे, सनी देओल, विवेक ओबेरॉय, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग आणि अरुण गोविल यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान, असा दावा केला जात आहे की ‘रामायण’ चित्रपटाच्या कार्यक्रमावेळी एक अविश्वसनीय गोष्ट घडली. पहिल्यांदाच प्रभू रामाने आपले भक्त हनुमानाच्या चरणांना स्पर्श केला. चित्रपटाच्या ट्रेलरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये, सनी देओल ‘रामायण’च्या हनुमानाच्या भूमिकेत शानदार एन्ट्री करताना दिसत आहेत. सनी देओल यांनी ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी मंचावर पाऊल ठेवताच, संपूर्ण टीम त्यांच्या स्वागतासाठी पुढे आली. इतर कलाकरांनी त्यांना मिठी मारली किंवी हात मिळवला. पण त्याच क्षणी, रणबीर कपूरने वाकून त्यांचा आशिर्वाद घेतला. यावरुन रणबीर कपूरचे संस्कार स्पष्ट दिसून आले. आपल्यापेक्षा मोठा कलाकारांना वाकून नमस्कार करणं हे आदराचे लक्षण मानले जाते. रणबीर कपूरने सनी देओलला येताना पाहताच तो त्यांचा थेट पाया पडला. आता या क्षणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामुळे चाहते आता त्याचं भरपूर कौतुक करत आहे.

मंचावर येताच सनी देओलने सर्वप्रथम सर्वांना भेटले त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर, ‘रामायण’ चित्रपटात काम करणे आपल्यासाठी सोपे नव्हते, हे सनी देओलने कबूल केले. ‘रामायण’च्या पहिल्या भागात सनी देओलची भूमिका फार मोठी असणार नाही. ते आता या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रॅलर लाँच हा 24 जुलै 2026 रोजी होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नितीश तिवारी यांनी केले आहे.  8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीत हा बहुचर्चित चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Follow Us