AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा कॅन्सरवर अखेर म्हणाल्या, ‘स्वतःच टेस्ट करुन घरी आले अन्…’, कसा होता ‘तो’ दिवस?

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कॅन्सर आणि त्यावरील उपचारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र मेधा यांची चर्चा रंगली आहे.

महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा कॅन्सरवर अखेर म्हणाल्या, 'स्वतःच टेस्ट करुन घरी आले अन्...', कसा होता 'तो' दिवस?
Medha Manjrekar
| Updated on: Jul 19, 2026 | 10:44 AM
Share

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत कॅन्सर झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी चिंता व्यक्त केलं. मेधा यांनी कोणालाच काहीच कल्पना नसताना कॅन्सरची पोस्ट केल्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मेधा यांनी कॅन्सरवरील उपचार, टेस्ट यांबद्दल खुलासा केला आहे. शिवाय माझ्या आईला देखील कॅन्सर झालेला, महेशला कॅन्सर झालेला आणि ते बरे देखील. मी देखील बरी होणार… असं देखील मेधा मुलाखतीत म्हणाल्या.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टबद्दल मेधा मांजरेकर म्हणाल्या, ‘ती पोस्ट खरं तर मी लोकांचे आभार मानण्यासाठी केलेली. गेल्या आठ महिन्यांपासून माझा प्रवास सुरु आहे. माझ्या घरात आईला कॅन्सर झालेलं मी पाहिलं आहे. महेशला देखील कॅन्सर झालेला आणि ते बरे देखील झाले. कॅन्सर झालेली मी पहिलीच नाही. अनेकांना कॅन्सर झाला आहे.’

‘जेव्हा मला कळलं की कॅन्सर झाला आहे, तेव्हा मला खरंच भीती वाटली नाही. कारण आता सायन्स पुढे गेलं आहे. चांगले उपचार आहे. किमोथेरपी देखील बऱ्यापैकी सोपी झाली आहे. थेरपी दरम्यान त्रास होतोच पण तुलनेने गोष्टी आता सहज सोप्या झाल्या आहेत.’

कॅन्सरचं निदान कधी झालं?

यावर मेधा यांनी मोठा किस्सा सांगितला. ‘मी एक ट्रिप प्लॅन केलेली. मला असं वाटलं की टेस्ट करायच्याच आहेत, तर आधी फिरुन येते. त्यानंतर टेस्ट करायला जाईल. त्यामुळे मी म्हटलं 10 दिवसांनीच टेस्ट करेल, त्यामुळे मी ट्रिपला गेले आणि फिरुन आल्यानंतर टेस्ट पूर्ण केल्या. त्यानंतर हा प्रवास सुरु झाला.’

‘ही टेस्ट मी स्वतःच जाऊन करुन आली, तेव्हा कळलं आणखी टेस्ट कराव्या लागतील. त्यानंतर घरी आल्यावर मी महेशला माझ्या कॅन्सरबद्दल सांगितलं. महेश खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्या कॅन्सरच्यावेळी देखील तो असाच पॉझिटिव्ह होता… माझी आई देखील बरी झाली आहे आणि मी देखील बरी होईल…’

‘माझा कॅन्सर जेनेटिक आहे. कारण आईला कॅन्सर झालेला. त्याला आता कोण काय करणार. काही गोष्टी स्वीकारणं आणि पुढे जाणं… त्यातून कसं बाहेर येता येईल हे पाहणं… जे हातात आहे ते करायचं आणि जे नाही ते स्वीकारायचं… कॅन्सर म्हटलं की आपण घाबरुन जातो. पण मी सगळ्यांना एकच सांगेल की, घाबरु नका… कारण आता चांगले उपचार आहेत. लढा तर द्यावाच लागणार कारण कॅन्सरपेक्षा उपचार अधिक वेदनादायी आहे… पण ठरवलं की सगळं होतं….’ असं देखील मेधा म्हणाल्या.

Follow Us
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!