Ranbir Kapoor | थेट रणबीर कपूर याचा पाठलाग करत एका व्यक्तीने केले ‘हे’ कृत्य, चाहत्यांमध्ये संतापाची लाट

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच तू झुठी में मक्कार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला होता. मात्र, चित्रपटाला काही धमाका करण्यात यश मिळाले नाही.

Ranbir Kapoor | थेट रणबीर कपूर याचा पाठलाग करत एका व्यक्तीने केले हे कृत्य, चाहत्यांमध्ये संतापाची लाट
| Updated on: Jul 16, 2023 | 6:51 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे स्टार हे पापाराझी यांच्यासोबतच चाहत्यांना फटकारताना दिसत आहेत. इच्छा नसताना फोटो (Photo) काढले जात असल्याचे बाॅलिवूडचे स्टार संताप व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने यावर नाराजी व्यक्त केली होती. सैफ अली खान हा देखील पापाराझी यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे काही दिवसांपूर्वीच बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काजोल हिने देखील चांगलाच समाचार घेतला होता. काजोल (Kajol) म्हणाली होती की, मी कोणत्या हाॅटेलमध्ये, पार्टीमध्ये किंवा बाॅलिवूडच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले नव्हते. मात्र, पापाराझी यांनी माझी गाडी बघितली आणि माझा पाठलाग केला.

जर माझ्या ठिकाणी कोणी सर्वसामान्य व्यक्ती असती आणि तिचा असा पाठलाग करण्यात आला असता तर त्याने थेट पोलिसात तक्रार दाखल केली असती. मात्र, मी स्टार असल्याने असे अजिबात करू शकत नाही. एका वेळी दहा ते पंधरा लोक तुमचे फोटो काढतात. तुम्ही कशा लूकमध्ये आहात, याचे देखील काही देणे घेणे त्यांना नसते. यांना आम्ही घाबरू शकत नाही, कारण आम्ही कलाकार आहोत.

मुलाखतीमध्ये चांगलाच क्लास घेताना काजोल ही दिसली. आता नुकताच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून परत एकदा बाॅलिवूड स्टारच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या पर्सनल लाईफचा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. व्हायरल होणारा व्हिडीओ हा रणबीर कपूर याचा आहे.

एक मुलगा रणबीर कपूर याच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहे. त्यानंतर गाडी थांबल्यानंतर तो गाडीच्या एकदम जवळ जाऊन फोटो काढताना दिसतोय. विशेष म्हणजे यासाठी रणबीर कपूर याचा चालक त्याला मनाई करतो. मात्र, मग गाडीमधील फोटो काढण्यासाठी तो मुलगा अजून जवळच जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

ज्यावेळी रस्त्यावरील लोक त्याला रागवतात त्यावेळी तो मुलगा तिथून निघून जाताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्या चाहत्यावर टिका करण्यास सुरूवात केलीये. तर काहीजण हे त्या चाहत्याची बाजू घेताना देखील दिसत आहेत. आता या व्हिडीओमुळे अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.