रणवीर-दीपिकाने आपल्या मुलीचे नाव चाहत्यांसोबत केले शेअर, पहिला फोटो आला समोर

णवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या मुलीचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले.

रणवीर-दीपिकाने आपल्या मुलीचे नाव चाहत्यांसोबत केले शेअर, पहिला फोटो आला समोर
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 11:37 PM

बॉलिवूडचे सर्वात फेव्हरेट कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले. आता दिवाळीच्या खास मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलीचे सुंदर नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या सुंदर जोडप्याने त्यांच्या लहान मुलीचे नाव “दुआ पदुकोण सिंग” ठेवले आहे. या दोघांसाठी ही दिवाळी खास आहे. कारण ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आनंद साजरा करत आहेत. हे जोडपे पहिल्यांदाच आपल्या छोट्या लेकीसोबत सण साजरा करत आहे.

दुसरीकडे, सिंघम अगेननेही त्याच दिवशी रिलीज होऊन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात दोन्ही सुपरस्टार मुख्य भूमिकेत आहेत.

ही खरोखरच प्रेक्षकांसाठी एक रोमांचक बातमी आहे, कारण प्रत्येकजण रणवीर आणि दीपिकाच्या बाळाचे नाव जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. अशा प्रकारे या दिवाळीच्या खास प्रसंगी सुपरस्टार्सनी सर्वांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. दुआ पदुकोण सिंग, ‘दुआ’: म्हणजे प्रार्थना.

चाहत्यांना ही पहिली झलक आणि नाव खूप आवडले आहे. या जोडप्याच्या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांचे खूप कौतुक करत आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या मुलीचे नाव जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता आणि अशा प्रकारे या दिवाळीच्या खास प्रसंगी सुपरस्टार्सनी सर्वांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. गोलियों की रासलीला राम-लीला दरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर 2018 साली लग्नाची ही प्रेमकथा पूर्ण केली.

दुआची झलक पाहिल्यानंतर आलिया भट्ट स्वतःला रोखू शकली नाही आणि तिने दुआवर खूप प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेत्रीने कमेंटमध्ये 14 रेड हार्ट्स एकत्र शेअर केले आहेत. या जोडप्याने आपल्या बाळाचे नाव एकत्र करून नाव ठेवण्याचा ट्रेंड सोडून वेगळे नाव ठेवले आहे. दुआची झलक पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली – छोटी लक्ष्मी दुआ.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.